News Flash

‘या’ कारणामुळे अभिनेता जिम्मी शेरगिलवर गुन्हा दाखल, पंजाब पोलिसांची कारवाई

पंजाबमध्ये करत होता शूटिंग

देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. करोनाच्या संसर्गावर ताबा मिळवण्यासाठी प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. शिवाय नागरिकांकडून या नियमांचं आणि सूचनांचं पालन होतंय का? हे पाहण्यासाठी पोलीस डोळ्यात अंजन घालून गस्त घालत आहेत. अशातच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याने करोनाच्या सूचनांच पालन न केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता जिमी शेरगिल पंजांबमध्ये ‘युअर ऑनर 2’ या वेब सीरिजचं शूटिंग करत होता. एका शाळेमध्ये या वेब सीरिजचं शूटिंग सुरू होतं. यावेळी नाईट कर्फ्यू असतानाही रात्री आठ वाजल्यानंतर शूटिंग सुरु असल्याने पोलिसांनी सेटवर धडक दिली. यावेळी सेटवर शंबर लोक उपस्थित होते. त्यामुळे करोनाच्या नियमावलीचं पालन न केल्याने जिमि शेरगिलसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबमध्ये देखील गेल्या काही दिवसात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळेच प्रशासनाने कडक प्रतिबंध लागू केले आहेत.अशातही रात्री आठनंतर शूटिंग सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jimmy Sheirgill (@jimmysheirgill)

काही दिवसांपूर्वीच अभिनेता जिमि शेरगिल करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत जमिने यासंदर्भात माहिती दिली होती. यावेळी जिमिने चाहत्यांना करोनाची लस घेण्याचं आवाहनदेखील केलं होतं. जिम्मी शेरगिल लवकरच ‘दाना-पानी 2’, ‘शरीक 2’ आणि ‘देव खरूद’ या सिनेमात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 4:58 pm

Web Title: panjab police files fir against jimmy shergil for breaking lock down protocol kpw 89
Next Stories
1 Indian Idol 12: सायली कांबळेचे वडील करोना रुग्णांसाठी चालवतात रुग्णवाहिका
2 ‘त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले मी मरणार…’, मुलाने केला खुलासा
3 “दर १० मिनिटांनी येणारा अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज आता….” ; हेमांगी कवीची फेसबूक पोस्ट व्हायरल
Just Now!
X