कतरिनाशी झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूरच्या आयुष्यात नवे प्रेम आले आहे. पण, यावेळी त्याच्या आयुष्यात आलेले हे नवे प्रेम म्हणजे त्याने घेतलेली नवी गाडी आहे.
बॉलीवूडलाइफ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर निळ्या रंगाच्या रेन्ज रोव्हर गाडीने फिरताना दिसला होता. याव्यतिरीक्त त्याच्याकडे ऑडी ए८ सुद्धा आहे. ही गाडी त्याच्या सोयीनुसार तयार करण्यात आलेली आहे. इतकेच नाही पण त्याच्याकडे ऑडी आर८ आणि आणखी एक रेन्ज रोव्हर सुद्धा आहे. त्याच्या गाड्यांची लिस्ट यावरच संपलेली नाही. रणबीरकडे या सर्व गाड्यांव्यतिरीक्त मर्सिडीज बेन्झ जी६३ ही गाडीदेखील आहे.
रणबीर प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी नसला तरी गाड्यांच्या बाबतीत बराच नशिबवान असल्याचे दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2016 रोजी प्रकाशित
ब्रेकअपनंतर रणबीरला मिळाले नवे प्रेम!
त्याच्या आयुष्यात आलेले नवे प्रेम..
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 16-02-2016 at 10:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Post break up with katrina ranbir kapoor buys a new car