News Flash

नागराजच्या ‘झुंड’साठी बिग बी सज्ज

नागराज या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्यामुळे हा त्याच्यासाठी महत्त्वाकांक्षी चित्रपट

अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे

वयाची पंच्याहत्तरी उलटूनही बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन त्याच तत्परतेने आणि कार्यक्षमतेने आजही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. तरुणाईलाही लाजवेल असा त्यांचा उत्साह पाहून अनेकांना काम करण्यासाठी हुरुप येतो. गेल्यावर्षी ‘सरकार ३’ वगळता त्यांचा दुसरा कोणताही चित्रपट आला नाही. मात्र, त्यांच्या चाहत्यांना आपल्या या आवडत्या अभिनेत्याला यावर्षात अनेक चित्रपटांमध्ये पाहता येणार आहे. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत ते ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात झळकणार आहेत. याव्यतिरीक्त ऋषी कपूर यांच्यासोबत ते ‘१०२ नॉट आउट’ चित्रपटातही दिसतील. दरम्यान, ‘सैराट’ चित्रपटाने यशाच्या शिखरावर पोहचलेला मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पदार्पणातच तो चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतोय. लवकरच या चित्रपटाच्याही चित्रीकरणाला सुरुवात होईल.

वाचा : कसला भारीये हा! विराटच्या शतकी खेळीवर अनुष्काची कमेंट

या महिन्याच्या मध्यात बिग बी हे नागराजच्या आगामी ‘झुंड’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करतील. अमिताभ यांनी बुधवारी त्यांच्या ब्लॉगवरून याविषयी माहिती दिली. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे चित्रीकरण आता काही दिवसांमध्ये संपेल. त्यानंतर लगेचच ते ‘झुंड’च्या कामाला सुरुवात करतील. ‘झुंड’ हा चरित्रपट असून, सत्य घटनेवर आधारित आहे.

वाचा : अक्षयच्या उपकारांची भन्साळी अशी करणार परतफेड

झोपडपट्टीतील काही मुलांना योग्य मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीची ही कथा आहे. हा एकप्रकारे चरित्रपट आहे असेही तुम्ही म्हणू शकता. खरंतर असा एक व्यक्ती आहे जो पुण्यात राहतो, असे बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले. नागराज या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्यामुळे हा त्याच्यासाठी महत्त्वाकांक्षी चित्रपट असले यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 11:47 am

Web Title: post wrap on thugs of hindostan amitabh bachchan to start shooting for nagraj manjules jhund
Next Stories
1 कसला भारीये हा! विराटच्या शतकी खेळीवर अनुष्काची कमेंट
2 TOP 10 NEWS : खिल्जी साकारणाऱ्या रणवीरपासून बिग बींपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर
3 अक्षयच्या उपकारांची भन्साळी अशी करणार परतफेड
Just Now!
X