महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या नसानसात भिनलेले स्वराज्य प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजरामर इतिहासाने प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येतो. महाराजांचे चरित्रपर ग्रंथ आणि पोवाड्यातून त्यांचे पराक्रम आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र,आजच्या तरुण आणि भावी पिढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराजांना अॅनिमेशन स्वरुपात मोठ्या पडद्यावर आणण्याचा अनोखा उपक्रम ‘प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटाद्वारे प्रथमच केला जात आहे.

वाचा फ्लॅशबॅक : प्रेम नाम है मेरा…!

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

गणराज असोसिएट्स प्रस्तुत तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक निर्मित हा अॅनिमेशनपट निलेश मुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. शिवाजी महाराजांचा कालखंड मांडणाऱ्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, मराठीतील दिग्गज कलाकारांची नावे यात जोडली गेली आहेत. समीर मुळे लिखित या अॅनिमेशनपटासाठी इतिहासकार निनाद बेडेकर यांनी संवाद आणि पटकथेचे सहाय्यक लेखन केले आहे. तसेच ज्येष्ठ इतिहासकारांची निरीक्षणे वापरून या चित्रपटाची कथा सादर करण्यात आली आहे. चित्रकार सदाशिव भाऊ साठे यांच्या कुंचल्यातून या चित्रपटातील पात्र रेखाटली गेली आहेत. शिवाय शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, श्रीरंग भावे, नंदेश उमप आणि उदेश उमप या गायकांची गाणीदेखील या चित्रपटात आकर्षणाचा विषय ठरणार आहेत. या चित्रपटातील सर्व गाणी प्रकाश राणे यांनी लिहिली असून, भारत बलवल्ली यांचे संगीत त्याला लाभले आहे. सचीन खेडेकर आणि सुदेश भोसले यांच्या भारदस्त आवाजाचे निवेदन यात असून, शिवाजी महाराजांना अभिनेता उमेश कामत आणि धर्मेंद्र गोहिल यांनी आवाज दिला आहे.

वाचा : माझ्या वडिलांची ही मिराशी

‘प्रभो शिवाजी राजे’ हा १०० मिनिटांचा अॅनिमेशनपट असून, शिवकालीन कालखंड यात दाखवला जाणार आहे. तसेच या चित्रपटाद्वारे, ३५० वर्षाहून अधिक वर्षे मोगल राजवटीत हालअपेष्टा सोसत असलेल्या आपल्या मातृभूमीसाठी ‘स्वराज्य’ची आरोळी ठोकणा-या या लढवय्या महापुरुषाला अनोखी मानवंदनादेखील दिली जाणार आहे. दीपक विरकुड आणि विलास रानडे यांनी या चित्रपटाचे संकलन केले असून, आगामी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १२ जानेवारील प्रदर्शित होत असलेला हा चित्रपट लवकरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.