22 October 2020

News Flash

व्हॅलेंटाइन व्हाया ‘What’s up लग्न’

सकाळी उठल्यापासूनचा प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा.

प्रार्थना बेहरे, वैभव तत्त्ववादी

‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची आवडती ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. ‘What’s up लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना-वैभव पुन्हा एकत्र दिसणार असल्याने ही जोडीच यंदाचं ‘व्हॅलेंटाइन कपल’ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

वाचा : जाणून घ्या, अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ची पहिल्या दिवसाची कमाई

‘व्हॅलेंटाइन डे’ म्हटला की दिवसभर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत धम्माल करायची. सकाळी उठल्यापासूनचा प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा. यात भेटवस्तू देणं, कॅाफी शॅापमध्ये जाऊन गप्पा मारणं, निसर्गरम्य स्थळी जाऊन आपल्या जीवनातील रोमॅण्टिक क्षण कैद करण्यासोबतच आपल्या प्रिय व्यक्तीला जे आवडतं ते करण्यातच स्वत:चा आनंद मानणं हे सुद्धा आलंच. वैभव-प्रार्थना हे यंदाचं व्हॅलेंटाइन कपल ‘What’s up लग्न’ या चित्रपटात अशाच प्रकारचे रोमॅण्टिक क्षण साजरे करताना दिसणार आहे.

वाचा : ‘गुलमोहर’मध्ये नवी प्रेमकथा अनामिका

फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट १६ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:54 pm

Web Title: prarthana behere and vaibhav tatwawadi whats up lagn releasing on 16 march
Next Stories
1 PadMan box office collection day 1: जाणून घ्या, अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ची पहिल्या दिवसाची कमाई
2 ‘गुलमोहर’मध्ये नवी प्रेमकथा अनामिका
3 TOP 10 NEWS : प्रियांकाच्या कमिटेड रिलेशनशीपपासून दीपिकाने वडिलांना दिलेल्या गिफ्टपर्यंत..
Just Now!
X