30 November 2020

News Flash

ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्रीचं नाव आलं समोर; पोलिसांनी सापळा रचून पकडलं

'देवों के देव महादेव' मालिकेतील अभिनेत्रीला ड्रग्ज खरेदी करताना अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. या यादीत आता टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान हिचं नाव देखील जोडलं गेलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांनी सापळा रचून प्रीतिकाला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं. तिच्याकडून ९९ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या प्रितिकाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रीतिका चौहान एक टीव्ही अभिनेत्री आहे. सावधान इंडिया, सीआयडी, संकटमोचन महाबली हनुमान यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे. देवो के देव महादेव या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. मात्र गेल्या काही काळात ती रुपेरी पडद्यापासून दूर आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 7:29 pm

Web Title: preetika chauhan arrested in drugs case mppg 94
Next Stories
1 विनयभंग प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकीला न्यायालयाकडून दिलासा
2 बिग बॉसच्या घरात होणार कविता कौशिकची एण्ट्री
3 रामायण, महाभारत घडलं तेव्हा केवळ हिंदूच होते का?; अभिनेत्याच्या प्रश्नावर कंगनानं दिलं उत्तर
Just Now!
X