News Flash

महिलांसाठी अधिक सुरक्षितता हवी

लक्ष्य’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

महिलांसाठी अधिक सुरक्षितता हवी
‘भरत आला परत’, ‘येडय़ांची जत्रा’, ‘चिरगुट’, ‘पॉवर’ अशा चित्रपटांतून तिने अभिनय केला आहे.

‘लक्ष्य’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर सब-इन्स्पेक्टर प्रेरणा सरदेसाई ही भूमिका आणि ती व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री धनश्री क्षीरसागर हीसुद्धा घराघरांत पोहोचली. मूळची नाशिकजवळील भगूर येथील असलेली धनश्री काही वर्षांपूर्वी कल्याण पश्चिम येथे राहायला आली आणि मुंबईकर बनली. एकांकिका, नाटक, सिनेमा, मालिका अशा प्रत्येक माध्यमात धनश्रीने छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या आहेत. ‘डरना गुन्हा है’ हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक. त्यानंतर ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘पुन्हा सही रे सही’, ‘दिवसा तू रात्री मी’, ‘केशवा माधवा’ अशा अनेक नाटकांचे प्रयोग तिने केले. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतील मंजुळा ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर तिची ‘लक्ष्य’ मालिकेसाठी निवड झाली. ‘लक्ष्य’ ही मालिका आणि त्यातील सब-इन्स्पेक्टरची व्यक्तिरेखा यामुळे धनश्रीला अभिनेत्री म्हणून चांगली ओळख मिळाली आहे. ‘भरत आला परत’, ‘येडय़ांची जत्रा’, ‘चिरगुट’, ‘पॉवर’ अशा चित्रपटांतून तिने अभिनय केला आहे.

’आवडते मराठी चित्रपट – ‘आपली माणसं’, ‘उंबरठा’, ‘आयत्या घरात घरोबा’
’आवडते हिंदी चित्रपट – ‘दो आँखे बारह हाथ’, ‘जंजीर’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’
’आवडती नाटकं – ‘तुझे आहे तुजपाशी’. या नाटकातील काकाजी ही व्यक्तिरेखा, काकाजींचे तर्कशास्त्र हे सारंच लाजवाब वाटलं.
’आवडते अभिनेते – आमिर खान, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे
’आवडत्या अभिनेत्री – अश्विनी भावे, मुक्ता बर्वे.
’आवडते दिग्दर्शक – मंगेश कदम
’आवडते लेखक/नाटककार – वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे.
’आवडलेल्या भूमिका – प्रत्येक भूमिका वेगळी मिळाली पाहिजे. लहानपणापासून पोलिसाची भूमिका करायला मिळावी असे वाटत होते. ‘लक्ष्य’मुळे ते शक्य झाले.
’आवडलेली पुस्तकं – ‘चौघीजणी’, विवेकानंदांवरची ‘योद्धा संन्यासी’ ही कादंबरी, ‘माझी जन्मठेप’ तसेच स्वा. सावरकरांची पुस्तके.
’आवडते सहकलावंत – मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, भरत जाधव
’आवडते खाद्यपदार्थ – गोड पदार्थ सगळेच आवडतात. गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड इत्यादी.
’आवडतं हॉटेल – गुरुदेव अनेक्स, कोकणरत्न.

’कल्याणविषयी थोडेसे – नाशिक येथून कल्याणमध्ये राहायला येऊन आता जवळपास १०-११ वर्षे झाली असली तरी कल्याणमध्ये आले तेव्हा नाशिकपेक्षा एकदम निराळं वातावरण असल्याची जाणीव लगेचच झाली. अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं हे मनाशी पक्कं केलं होतं. नाशिकमध्ये असताना आनंद म्हसवेकर यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनीच कल्याणमध्ये राहायला आल्यानंतर मला पहिलं व्यावसायिक नाटकात काम दिले. कल्याण पश्चिम येथील वायले नगरमध्ये आमचे कुटुंब राहते. इथे राहायला आल्यानंतरच्या काळात कल्याण ते मुंबई कधी लोकल, कधी बसने प्रवास करून नाटकात काम सुरू केले, स्ट्रगल केले आहे. कल्याणमध्ये चांगली माणसं भेटली हे नमूद करावे लागेल. गेल्या दहा-अकरा वर्षांत कल्याण शहर विस्तारले, सुविधाही चांगल्या झाल्या आहेत. मात्र रस्ते, खड्डे, स्टेशन परिसरातील वाहतुकीची समस्या, रहदारी यावर उपाययोजना करायला हवी. कल्याणमध्ये रिक्षात बसल्यानंतर तरुणींना, महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा आणि एखादी घटना घडत असेल तर पोलिसांना ताबडतोब त्याची माहिती मिळावी यासाठी यंत्रणा अमलात आणली जावी अशी इच्छा आहे. कल्याणमधील महिलांसाठी सुरक्षित शहर आहे. परंतु, ते अधिक सुरक्षित करण्यासाठी अशी विशिष्ट यंत्रणा महिलांच्या मदतीसाठी करता येऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 2:52 am

Web Title: prerna sardesai said need more safety for women
Next Stories
1 माझ्या शाहिदचा ‘शानदार’ सुपरहिट ठरेल- मीरा
2 एडिनबर्ग विद्यापीठाकडून शाहरुखला ‘डॉक्टरेट’ प्रदान
3 तुमच्याकडे स्टार होण्याचे कौशल्य आहे का ? मग ‘लेट्स गेट कनेक्टेड ‘
Just Now!
X