ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरली आहे. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पहाताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने ३५० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे.

या मालिकेत एक नवीन व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ती म्हणजे नचिकेतची आई इरा देशपांडे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एका नवीन सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेत एण्ट्री होणार आहे. ती म्हणजे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे. पुण्यात लहानाची मोठी झालेली इरा लग्न करून ऑस्ट्रेलियाला गेली आणि गेली २५ वर्ष ती तिकडेच राहते आहे. नचिकेतवर १० लाखांचे कर्ज आहे त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी ती इकडे आली आहे. ती विचाराने अगदी मॉडर्न आहे. त्यामुळे नचिकेत जेव्हा एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नव्या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत एक वेगळी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. मी या आधी कधीच NRI ची भूमिका निभावली नव्हती त्यामुळे मी खूप एन्जॉय करतेय आणि प्रेक्षकांना देखील माझी हि नवीन भूमिका बघायला नक्की आवडेल अशी मी आशा करते.”