13 December 2019

News Flash

प्रियंका-निकनं घेतलं नवं घर; किंमत तुम्ही ऐकली का?

हे घर २० हजार चौरस मीटरचे आहे.

प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याचे लग्नानंतर स्वत:चे असे मोठे घर असावे हे स्वप्न असते. हे स्वप्न अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या नव्या जोडप्यानचे पूर्ण झाले आहे. सध्या त्यांनी घेतलेल्या नव्या घराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या घराची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

प्रियांका आणि निकने लॉस एंजल्स येथे २० हजार चौरस मीटरचे नवे घर घेतले आहे. या घराची किंमत २० मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलना नुसार १४४ कोटी रुपये आहे. या मॉडर्न घरात सात बेडरुम, अकरा बाथरुम असल्याचे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी निकने त्याचे बॅचलर घर विकले होते आणि तो प्रियांकासोबत राहण्यासाठी नव्या घराच्या शोधात होता. अखेर आता निक आणि प्रियांकाने नवे घर घतले आहे.

 

View this post on Instagram

 

#Cannes2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

काही दिवसांपूर्वी प्रियांकाने वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवे घर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘घर घेणे आणि आई होणे या माझ्या दोन इच्छा आहेत’ असे प्रियांका म्हणाली होती. ‘माझ्यासाठी घर म्हणजे जिकडे मी आनंदात राहिन आणि माझ्या आजूबाजूला राहणारे लोक आनंदी असतील’ असे प्रियांका पुढे म्हणाली आहे.

आणखी वाचा : रोहित, इम्राननंतर आता दिशानेही घेतली नवी कार, किंमत ऐकली का??

गेल्या वर्षी एक आणि दोन डिसेंबरला प्रियांका आणि निक लग्न बंधनात अडकले. येत्या काही दिवसांमध्येच ते लग्नचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. लग्नाचा पहिलाच वाढदिवस निक आणि प्रियांका कुठे आणि कसा साजरा करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

First Published on November 14, 2019 12:52 pm

Web Title: priyanka chopra and nick jonas have spent 20 million for new house avb 95
Just Now!
X