News Flash

‘क्वांटिको’च्या सेटवर प्रियांका जखमी

मालिकेच्या सेटवर जखमी झाल्याने प्रियांकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एबीसी क्वांटिको या मालिकेच्या सेटवर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एबीसी क्वांटिको या मालिकेच्या सेटवर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती आता ठीक असल्याने तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. सेटवर जखमी झाल्यानंतर प्रियांकाने काही दिवस आराम करण्याचा निर्णय घेतल्याचे, सेटवरील सूत्रांनी म्हटले आहे.

क्वांटिको या परेदशी मालिकेत काम करत असलेल्या प्रियांकाला गुरुवारी सेटवर दुखापत झाली. त्यावेळी तिला इजा झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रियांकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात योग्य ते उपचार घेतल्यानंतर तिला आता घरी पाठविण्यात आल्याचे, सेटवरील सूत्रांनी सांगितले. एबीसी क्वांटिकोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीत म्हटले की, न्यू यॉर्कच्या सेटवर एक किरकोळ घटना घडली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या घरीच आहे. तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. प्रियांका जखमी झाली असली तरी त्याचा मालिकेच्या चित्रीकरणावर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रियांकाशिवाय सध्या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. जवळपास एक आठवड्यानंतर प्रियांका तिच्या कामाला सुरुवात करू शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 11:29 am

Web Title: priyanka chopra hospitalized after accident on abcs quantico set
Next Stories
1 “मुंबईची सुकन्या” होऊ दे जल्लोष करूया गौरव स्त्री कौशल्याचा
2 रोहिणीताईंनी कथकसाठी आयुष्य वेचले
3 रमेश आणि सीमा देव यांचे नृत्य आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद!
Just Now!
X