News Flash

प्रियांका आणि निक करणार घोषणा…..जाणून घ्या, काय आहे नक्की?

हे स्टार कपल हॉलीवूडवर आपला प्रभाव पाडत आहे.

आपल्यातल्या टॅलेंटने बॉलीवूडमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केल्यावर प्रियांका चोप्राने आपला मोर्चा वळवला हॉलीवूडकडे! तिथेही तिचं नाणं एकदम खणखणीत वाजलं. पॉपस्टार, गायक निक जोनससोबत तिने लग्न केलं आणि आता ती एक महत्त्वाची घोषणा करणार आहे.

ही महत्त्वाची घोषणा आहे ऑस्करसंदर्भातली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस आणि तिचा पती निक जोनस हे दोघेही सोमवारी म्हणजेच १५ मार्चला सर्व २३ विभागांमधली ऑस्कर नामांकनं जाहीर करणार आहेत. ग्लोबल लाईव्ह स्ट्रिमींगद्वारे हा सोहळा पाहता येणार आहे.

प्रियांका आणि निक या दोघांनीही सोशल मीडियावरून ही गोष्ट शेअर केली आहे. प्रियांकाने तर आपला एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये अकॅडमीला टॅग करत लिहिते, “असं होऊ शकतं का की ऑस्करची नामांकनं मी एकटीच जाहीर करेन? चेष्टा करत होते, लव्ह यू @nickjonas. आम्ही सोमवारी म्हणजे १५ मार्च रोजी सकाळी ५ वाजून १९ मिनीटांनी ऑस्कर नामांकनं जाहीर करण्यासाठी फार उत्सुक आहोत. आम्हाला लाईव्ह पाहा @TheAcademyच्या ट्विटर अकाऊंटवर….!”

ही जोडी सोमवारी सर्व २३ विभागातली नामांकनं जाहीर करेल. अकॅडमीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून म्हणजे Oscars.com आणि Oscar.org तसंच अकॅडमीच्या सर्व डिजीटल प्लॅटफॉर्म्सवरून लाईव्ह ग्लोबल स्ट्रिमिंगद्वारे हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळा हा सहसा एप्रिल महिन्यात होतो. पण या वर्षी करोना महामारीमुळे हा सोहळा लांबणीवर पडला असून आता तो २६ एप्रिलला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2021 2:50 pm

Web Title: priyanka chopra jonas and her husband nick jonas to be announce oscar nomination vsk 98
Next Stories
1 महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘राधे श्याम’चं नवं पोस्टर; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
2 ‘भगवान शंकराचा फोटो फॉरवर्ड करुन नाही तर…’, सोनू सूदचे ट्वीट चर्चेत
3 एवढा बदलला आमिर खानचा मुलगा की आता ओळखूही येत नाही…..
Just Now!
X