News Flash

“तेव्हा माझं घर म्हणजे बगीचा झाला होता”- प्रियांका चोप्रा

प्रियांकाने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी झाली आहे. बॉलिवूडसोबतच तिने हॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. परंतु, ती एका चित्रपटातल्या अभिनयासाठी विशेष नावाजली गेली. तो म्हणजे ‘बाजीराव मस्तानी’. यातल्या तिच्या भूमिकेबद्दल प्रियांका एका मुलाखतीत बोलत होती. तेव्हा ती काय म्हणाली…जाणून घेऊया.

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रियांकाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रियांकाला विचारण्यात आलं की जेव्हा तुला स्क्रिप्ट वाचून दाखवली, त्यावेळी तुला मस्तानीची भूमिका करण्याची इच्छा झाली नाही का? त्यावेळी प्रियांकाने सांगितलं की, लोकांना तिची भूमिका एवढी आवडली होती की, लोकांनी तिचं अभिनंदन करण्यासाठी फुलंच फुलं पाठवली होती. या प्रश्नाचं उत्तर देताना प्रियांका म्हणाली, “तुम्ही चित्रपट पाहिला आहे का? मी काय करायला हवं होतं? माझं घर म्हणजे बगीचा झाला होता.”

२०१५मध्ये ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने पेशवे बाजीराव यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रियांका पेशव्यांची पत्नी काशीबाई या भूमिकेत होती, तर दिपीका पादुकोन मस्तानीच्या भूमिकेत होती. तिघांनीही आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला आणि त्याने चांगला गल्ला कमवला. या चित्रपट रणवीर आणि दिपीका यांची प्रमुख भूमिका होती, पण प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस पडलेली भूमिका म्हणजे प्रियांकाचीच.

प्रियांकासाठीसुद्धा ही भूमिका तिच्या करियरमधली सर्वात अवघड भूमिका होती. तिने याबद्दल ट्विटही केलं होतं. या चित्रपटातील तिचे संवाद प्रचंड गाजले आणि आजही व्हायरल होत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 8:17 pm

Web Title: priyanka chopra opens up about her role in bajirao mastani vsk 98
Next Stories
1 अक्षय कुमार आणि लिओनार्दो दि कॅप्रिओ यांना पुरस्कार जाहीर; पर्यावरण संवर्धनासंदर्भातील कामाचा सन्मान
2 ‘सत्यशोधक’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 गश्मीर महाजनीच्या मुलाची मुंज? मुलाच्या ‘या’ फोटोंवर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
Just Now!
X