27 February 2021

News Flash

मिसवर्ल्ड स्पर्धेत घडला ‘तो’ धक्कादायक प्रसंग; प्रियांका म्हणाली…

जाणून घ्या, नेमक काय आहे प्रकरण

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. कधी तिच्या फॅशन सेन्समुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. यावेळी प्रियांका तिच्या कोणत्याही पोस्टमुळे नव्हे तर एका दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात प्रियांकाने तिच्या मिस वर्ल्ड होण्याच्या प्रवासातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाने ‘जिमी फॅलनच्या टु नाईट शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना मिसवर्ल्डच्या फिनालेपूर्वी तिच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग घडल्याचं तिने सांगितलं. “फिनालेमध्ये माझ्या चेहऱ्यावर केसांची एक बट सतत येत होती. त्यावेळी ही बट मी जाणूनबुजून ठेवल्याचं दाखवत होते. परंतु, प्रत्यक्षात तसं नव्हतं. ही बट मी ठेवली नसून माझे केस कुरळे करण्याच्या नादात ते जळाले होते” असं प्रियांका म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “त्यावेळी जवळपास ९० च्या आसपास मुली होत्या. त्यामुळे प्रत्येकीची मेकअप आणि हेअर स्टाइल करण्यासाठी गडबड सुरु होती. यामध्येच मी केस कुरळे करत असताना एका मुलीचा धक्का लागला आणि माझ्या केसांची बट जळाली. इतकंच नाही तर माझ्या कपाळावरही चटका बसला होता. पण, मी कपाळावर कन्सिलर लावून तो लपवला. केसांची जळालेली बट लपवणं त्यावेळी शक्य नव्हतं. त्यामुळे मी ती तशीच ठेवत त्याचा वापर स्टाइलचा एक भाग म्हणून केला.”

दरम्यान, प्रियांकाची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चिली जात आहे. प्रियांकाने २००० मध्ये मिस वर्ल्ड खिताब जिंकला होता. अलिकडेच प्रियांकाचं ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालं. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 11:45 am

Web Title: priyanka chopra said that she was burnt just before the day of the event dcp 98
Next Stories
1 पत्नीसोबतचा ‘तो’ व्हिडिओ शेअर केल्याने विवेक ओबेरॉय अडचणीत, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
2 दहापेक्षा अधिक मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज
3 अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे ‘झुंड’मध्ये एकत्र; शेअर केली प्रदर्शनाची तारीख
Just Now!
X