News Flash

“प्रियांका चोप्राची बहीण असल्याने मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नाही”, मीरा चोप्राचा खुलासा

मीराने काही साउथ सिनेमांमध्ये काम केलं आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या चुलत बहिणीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री मीरा चोप्रा ही प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राची चुलत बहिण आहे. मीराने आजवर काही साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका तामिळ सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने काही तेलगू सिनेमांमध्ये देखील काम केलं. मीराने ‘गँग ऑफ घोस्ट’, ‘1920 लंडन’, ‘सेक्शन 375’ अशा काही मोजक्या बॉलिवूड सिनेमांध्ये काम केलं आहे.

मीरा चोप्रा बॉलिवूडमध्ये तिचं नशीब आजमवतेय. मात्र प्रियांका चोप्रामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचा आरोप मीराने केला आहे. एवढचं नाही तर त्यानंतर संघर्ष वाढला असल्याचं ती म्हणाली आहे.

एक मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हा मी बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार होतो तेव्हा बरीच चर्चा रंगली की, प्रियांका चोप्राच्या बहिणीची एण्ट्री होतेय. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला बऱ्याच तुलनांचा तसा सामना करावा लागला नाही. प्रियांकामुळे मला काही काम मिळालं नाही.” असं ती म्हणाली, झूमला दिलेल्या एका मुलाखती मीरा म्हणाली, ” जेव्हा मी एखाद्या निर्मात्याकडे काम मागण्यासाठी जायचे तेव्ही मी प्रियांकाची बहिण असल्याने ते मला कास्ट नाही करायचे.” प्रियांका किंवा परिणीतीशी माझी तुलना न केल्याने मी स्वत:ला नशीबवा समजत असल्याचं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Chopra (@meerachopra)

मीरा या मुलाखतीत म्हणाली, ” तिच्याशी संबध असल्याचा फायदा मला माझ्या करिअरसाठी तरी झाला नाही. मात्र यामुळे लोकांनी माझ्याकडे गांभिर्याने पाहिलं ते महत्वाचं. सिनेमाची जाण असलेल्या कुटुंबातून मी येत आहे हे लोकांना माहित असल्याने त्यांनी मला गृहित धरलं नाही. नाही तर मला संघर्ष करावा लागला असता. ” असं ती म्हणाली.

मीरा चोप्रा ‘द टॅटू मर्डर’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. या वेब सीरिजमध्ये कुलभूषण खरबंदा, वरुण जोशी, तनुज विरवानी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:08 pm

Web Title: priyanka chopras cousin meera chopra said she did not get work because of priyanka chopra in bollywood kpw 89
Next Stories
1 स्मिता पाटील… प्रतिक बब्बरने छातीवर काढला आईच्या नावाचा टॅट्यू
2 ‘हा’ मराठमोळा अभिनेता अडकणार दुसऱ्यांदा लग्नबंधनात
3 कंगनाने शाहरुखसोबत केली स्वत: ची तुलना, म्हणाली दोघांमध्ये आहे एवढाच फरक
Just Now!
X