11 August 2020

News Flash

.. तेव्हाच प्रियांका करणार लग्न!

केवळ वय झाले म्हणून लग्न करायला हवे असे म्हणणे चुकीचे आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या अनेकांची लग्न होत आहेत. चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकालाचं उत्सुकता असते. आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याही लग्नाची चर्चा सध्या सुरु आहे. यशाच्या शिखरावर असलेली क्वॉटिंको गर्ल प्रियांका केव्हा लग्न करणार असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडलायं. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिलेयं तिची आई मधु चोप्रा यांनी.
प्रियांका आता लग्न करणार का, तुम्ही तिच्याशी याबाबत बोललात का? असा प्रश्न पत्रकाराने केला असता प्रियांकाची आई मधु चोप्रा म्हणाली की , नाही. मी खूप आधी तिच्याशी यावर बोलले होते. पण आता मी याबाबत तिच्याशी चर्चा करत नाही. आज मी अनेक जणांची लग्न मोडलेली पाहतेय. सध्या लोकांमध्ये सहनशक्ती दिसून येत नाही. आणि ते आपलं नात टिकवण्यासाठीही काही प्रयत्न करत नाहीत. जेव्हा प्रियांका नाते जपण्याच्या आणि ते वृद्धिंगत करण्याच्या मानसिकतेत असेल तेव्हाच ती लग्न करेल. वयाच्या एका ठराविक पडावर असल्यावर तुम्ही लग्न केलेच पाहिजे, असे काही नाही. केवळ वय झाले म्हणून लग्न करायला हवे असे म्हणणे चुकीचे आहे. प्रियांकाने केव्हा लग्न करायचे हा तिचा वैयक्तिक निर्णय असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 1:51 pm

Web Title: priyanka will get married when she is ready and has the time to nurture a relationship says her mom
टॅग Priyanka Chopra
Next Stories
1 बापरे! चित्रपटासाठी या अभिनेत्याने स्वत:ला पाच दिवस कोंडून घेतले!
2 ‘करिश्मासोबत माझं ब्रेकअप झालेलं नाही’
3 नागराजच्या ‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाईकडे वाटचाल!
Just Now!
X