News Flash

‘बिग बॉस १४’मध्ये होणार राधे माँ यांची एण्ट्री?

बिग बॉस १३साठी देखील त्यांना विचारण्यात आले होते.

लवकर छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण बॉलिवूड अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता शोमध्ये राधे माँ या सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘टेली चक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार राधे माँ यांनी बिग बॉस पर्व १४साठी होकार दिला आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांनी बिग बॉस १३साठी देखील राधे माँ यांना विचारले होते. पण काही कारणास्तव त्यांनी नकार दिला होता. पण आता आगामी सीझनमध्ये राधे माँ या दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत राधे माँ यांच्या टीमकडून किंवा बिग बॉसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

‘द खबरी’ या ट्विटर हँडलने देखील ट्विट करत राधे माँ बिग बॉस १४मध्ये दिसणार असल्याचे म्हटले. ‘राधे माँ यांना बिग बॉस १४साठी विचारण्यात आले होते. तुम्हाला त्यांना बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का?’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी निशांत मल्कानी, पर्ल वी पुरी, जॅस्मिन भसीन, निया शर्मा, शिरीन मिर्जा, सुगंधा मिश्रा, मानसी श्रीवास्तव, शांतिप्रिया, साक्षी चोपड़ा, पवित्रा पूनिया आणि निखिल चिनप्पा हे कलाकार बिग बॉस १४मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता राधे माँ यांच्या नावाची देखील चर्चा सुरु झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 4:28 pm

Web Title: radhe maa reportedly to be seen in salman khan hosted bigg boss 14 avb 95
Next Stories
1 कंगना रणौतची रणवीर सिंग आणि रणबीर कपूरला विनंती; म्हणाली…’अशी अफवा पसरली आहे की…’
2 “या पैशांनी गरीबांची मदत करा”; नव्या कारमुळे बिग बींना केलं जातय ट्रोल
3 कंगनाचा करण जोहरवर निशाणा, म्हणाली…
Just Now!
X