News Flash

‘वारंवार चाचण्या…’, राधिका आपटेने सांगितला करोना काळातील शूटिंगचा अनुभव

नुकताच राधिकाने 'मिसेस अंडरकव्हर' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

radhika apte,

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने नुकतीच ‘मिसेस अंडरकव्हर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. करोना काळातील या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता हे राधिकाने सांगितले आहे.

राधिकाने स्वत:च याविषयीचा खुलासा केला, ती म्हणाली, “अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार करोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या.

ही ओटीटी क्वीन सध्या यशाच्या शिखरावर असून तिच्याकडे अनेक मुख्य मासिकांची मुखपृष्ठे आहेत तसेच, ‘ओके कॉम्प्यूटर’ या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाल्यानंतर राधिका लवकरच काही चित्रपटांमध्ये प्रमूख भूमिकेत दिसणार आहे. ज्यामध्ये ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि काही अघोषित प्रकल्पांचा सहभाग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 4:35 pm

Web Title: radhika apte on shooting in pandemic avb 95
Next Stories
1 करोनामुळे अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, पोस्टद्वारे दिली माहिती
2 ‘‘पैशासाठी आम्ही…”, पंजाब किंग्जच्या क्रिकेटपटूचा अक्षय कुमारला टोला
3 करोनाच्या संकटात शाहिद मीराचं योगदान, मदतीसाठी चाहत्यांना आवाहन
Just Now!
X