टेलिव्हिजन क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली निर्माती एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ या वेब सीरिजचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याबद्दल बरीच चर्चा केली जातेय. हॉरेक्स (हॉरर आणि सेक्स) प्रकारातील या वेब सीरिजच्या सेटवरील एका वृत्ताने काही दिवसांपूर्वी सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मध्ये मुख्य भूमिका असलेल्या रिया सेनने प्रणयदृश्य चित्रीत होत असताना तिचा सहकलाकार निशांत मलकानीची पँट खेचल्याचे म्हटले जात होते. मात्र, दृश्याची मागणी म्हणून करण्यात आलेला हा अभिनय निशांतसाठी डोकेदुखी झाल्याचे चित्र आहे.
वाचा : एमएमएस ते मुलाचं नाव, ‘या’ कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती करिना
‘मिले जब हम तुम’, ‘राम मिलायी जोडी’ या मालिकांमध्ये झळकलेल्या निशांतने फेसबुकवर याप्रकरणी त्याची बाजू मांडणारी पोस्ट शेअर केली. तसेच, हे ‘ओपन लेटर’ त्याच्या मित्रांनी आणि चाहत्यांनीही शेअर करावे अशी विनंती केली. या पत्रात त्याने रियाने कधीच त्याचा लैंगिक छळ न केल्याचे म्हटले. तसेच, शहानिशा न करता रियाबद्दल वाईट लिहिणाऱ्या व्यक्तींनाही त्याने फटकारले. निशांतच्या म्हणण्यानुसार, ते प्रणयदृश्य वास्तववादी वाटावे म्हणून रियाने तसे केले. यात त्याच्यावर कोणताही अत्याचार झाल्यासारखे त्याला वाटले नाही.
‘सेक्शुअल हरॅसमेन्ट’ या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्यामागचे गांभीर्यही निशांतने त्याच्या पोस्टमध्ये समजावून सांगितले. त्याचसोबत लैंगिक छळामध्ये लिंगभेद नसतो असे म्हणत, कोणत्याच महिलेने घाबरून आणि कोणत्याही पुरुषाने केवळ ‘मर्द’ म्हणून असा छळ सहन करु नये, असा सल्लाही दिला.
वाचा : Padmavati first look राणी पद्मावती पधार रही हैं..
‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मध्ये करिष्मा शर्मा, निशांत सिंग मलकानी आणि रिया सेन यांच्या भूमिका आहेत. एका कॉलेजमध्ये घडणाऱ्या भयावह घटनांच्या साक्षीदार असलेल्या दोन मुलींवर या वेब सीरिजची कथा आधारित आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 11:53 am