News Flash

राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या रोमॅण्टिक डान्सचा व्हिडीओ व्हायरल; शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले लव्ह बर्ड्स

राहुल वैद्यने नुकताच दोघांचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केलाय. लव्ह बर्ड्सच्या या रोमॅण्टिक व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं.

()Photo: Instagram@dishaparmar)

राहुल वैद्य आण दिशा परमार हे लव्ह बर्ड्स गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे बरेच चर्चेत आले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या विधींना देखील सुरवात झालेली आहे. त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोघांच्या ही चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्टपणे झळकताना दिसून येतोय. त्यानंतर आता राहुल वैद्यने नुकताच दोघांचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तो दिशा परमारसोबत डान्स करताना दिसून येतोय. लव्ह बर्ड्सच्या या रोमॅण्टिक व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. दोघांच्याही फॅन्सनी त्यांच्या या व्हिडीओवर लाखो लाइक्स दिले आहेत.

राहुल वैद्य याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या व्हिडीओ आतापर्यंत १ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAHUL VAIDYA RKV (@rahulvaidyarkv)

या दोघांनीही शाहरूख खानच्या ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यावर डान्स केलाय. या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे फॅन्स त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. हे दोघेही त्यांच्या प्रवासातील एकूण एक क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी विसरत नाहीत. काही दिवसांपुर्वीच त्यांनी डान्स प्रॅक्टिसचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओसुद्धा चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by DP (@dishaparmar)

बिग बॉसने निर्माण केली वेगळी ओळख

राहुल आणि वैद्य या दोघांनी जेव्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती, त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढत गेला. दोघांनीही त्यांचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर झटपट व्हायरल होऊ लागले. येत्या १६ जुलै रोजी ते विवाहबंधनात अडकणार आहेत. बऱ्याच दिवसांच्या रिलेशनशीप नंतर अखेर उद्या या दोघांच्या नात्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब लागणार आहेत. या दोघांसोबत त्यांचे फॅन्ससुद्धा दोघांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 5:14 pm

Web Title: rahul vaidya and disha parmar romantic dance on shah rukh khan song video viral prp 93
Next Stories
1 आदित्य देसाई विरूद्ध आदित्य देसाई, ‘माझा होशिल ना’मध्ये नवे वळण
2 करीना कपूरचा दुसरा मुलगा ‘जेह’चे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल; चाहते म्हणाले…
3 Video: गाडी बंद न करताच हृतिक खाली उतरला अन्….
Just Now!
X