News Flash

नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत RRRच्या टीमने शेअर केलं नवीन पोस्टर

हा चित्रपटा १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

(Photo credit : RRR Instagram)

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात निर्माण होणारा सगळ्यांत मोठा चित्रपट म्हणजेच ‘RRR’. या चित्रपटाच पूर्ण नाव हे ‘रौद्रम रणम रुधिरम’ आहे. उगाडीच्या निमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. हे पोस्टर ‘आरआरआर’च्या टीमने सोशल मीडियावर शेअर केले आहे. शेअर करताच प्रेक्षकांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘RRR’च्या टीमने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवरून चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टर मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण दिसत आहेत. हे पोस्टर पाहिल्यानंतर, हा फोटो एखाद्या उत्सवातील किंवा चित्रपटातील कोणत्या गाण्यातील असल्याचे दिसते. यात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण दोघे ही आनंदात असल्याचे दिसत आहे. “तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…”अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी या पोस्टरला दिले आहे. पोस्टर शेअर करताच ४८ हजार पेक्षा जास्त लोकांनी याला लाइक केले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली आहेत. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारत आहे. तर राम चरण हा अल्लुरी सिताराम राजू ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त आलिया भट्ट, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे अनेक कलाकार यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० भाषांमध्ये हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:49 pm

Web Title: ram charan and jr ntr s rrr movie s new poster is released dcp 98
Next Stories
1 परवीन बाबीमुळे पत्नीला दिला होता नाव बदलण्याचा सल्ला, कबीर बेदींनी केला खुलासा
2 ‘टकाटक पार्ट २’; नवीन वर्षाच्या सुरुवातीला चित्रीकरणाला टकाटक सुरुवात
3 “मागच्या वर्षी झोपलेलात का तुम्ही?”; लॉकडाउनच्या ‘त्या’ विधानामुळे महेश कोठारे ट्रोल!
Just Now!
X