03 March 2021

News Flash

‘मला स्त्रियांचा मेंदू नाही शरीर आवडतं’; राम गोपाल वर्मांचं वादग्रस्त वक्तव्य

राम गोपाल वर्मांनी केलं स्त्रियांविषयी वादग्रस्त वक्तव्य

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी देखील त्यांनी असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. मला महिलांचं शरीर आवडतं, मेंदू नाही, असं वक्तव्यांनी त्यांनी केल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“मेंदू स्त्रियांनाही असतो आणि पुरुषांनाही. मात्र लैंगिक पैलू अत्यंत वेगळा आणि विशिष्ट आहे. स्त्रीजवळ एक महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे तिची कामुकता आणि त्या गोष्टीची मी प्रशंसा करतो. माझ्या ‘Guns & Thighs’ या पुस्तकातदेखील मी त्याविषयी लिहिलं आहे. मला स्त्रियांचं शरीर आवडतं, पण मेंदू नाही”, असं वक्तव्य राम गोपाल वर्मा यांनी केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by RGV (@rgvzoomin)


दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वीदेखील स्त्रियांविषयी असंच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांना टीकेलादेखील सामोरं जावं लागलं होतं. सध्या राम गोपाल वर्मा त्यांच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहेत. ’12 ओ क्लॉक’ असं त्यांच्या चित्रपटाचं नाव असून हा हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता मिथुन चक्रवर्ती एका मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 3:09 pm

Web Title: ram gopal varma i still maintain i like womens bodies not their brains ssj 93
Next Stories
1 वयाच्या ४२व्या वर्षी ‘कसौटी जिंदगी की’मधील अभिनेता अडकणार लग्न बंधनात?
2 पहिल्यांदाच शोमध्ये बंद झाला एक्सपर्टचा आवाज, अमिताभ बच्चन यांनी लढवली अनोखी शक्कल
3 बच्चन पांडेसाठी अक्षय कुमारचा राऊडी लूक; फोटो पाहून व्हाल चकित
Just Now!
X