News Flash

रणबीर कपूरने ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी पार्क केली अन्…

जाणून घ्या सविस्तर...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचे आणि अभिनेत्री आलिया भट्टचे कायम फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा त्यांचे डिनर डेटवर जाताना किंवा एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता रणबीर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या मागचे कारण म्हणजे रणबीर कपूरची कार.

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रणबीरने मुंबईमध्ये ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी पार्क केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गाडीचे टायर लॉक करुन ती ताब्यात घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor (@ranbir_kapoooor)

आणखी वाचा :राजीव कपूर यांच्या निधनानंतर पुतणी करिना कपूरने केली पोस्ट, म्हणाली…

मंगळवारी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी रणबीर कपूरचे काका राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. रणबीर काकांच्या अगदी जवळचा होता. शुक्रवारी कपूर कुटुंबीयांनी प्रेअर मीट ठेवली होती. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार तेथे उपस्थित होते.

रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून या चित्रपटात रणबीरची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 1:53 pm

Web Title: ranbir kapoor car gets locked by mumbai police for parking in a no parking zone avb 95
Next Stories
1 ‘आम्ही प्रेमात पडलो अन्…’, जाणून घ्या ‘शनाया’ची लव्हस्टोरी
2 ‘सैराट’मधील बाळ्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस
3 राज कुंद्राने सांगितलं बेडरूम सिक्रेट, शिल्पा झाली शॉक म्हणाली…
Just Now!
X