News Flash

‘ए दिल है मुश्किल’चा शेवट कळला?

'कल हो ना हो' सिनेमाचा शेवटही त्याने वेगळा केला होता

'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटाला मनसेने विरोध दर्शवला आहे.

करण जोहरचा ‘ए दिल है मुश्किल’च्या कथानकावरुन दररोज काही ना काही नवे ऐकायला आणि वाचायला मिळत आहे. या सिनेमाशी निगडीत आता अजून एक नवीन बातमी समोर येत आहे. या सिनेमातले रणबीर कपूरचे एकतर्फी प्रेम शेवटपर्यंत अधूरेच राहते.
सिनेमाच्या टिझर आणि गाण्यात जे दृश्य दाखवण्यात आले, त्यावरुन रणबीरचे प्रेम अनुष्का बरोबर नाही तर ऐश्वर्या रायच्या व्यक्तिरेखेमुळे पूर्ण होते. पण करण आपल्या सिनेमात नेहमीच काही ना काही ट्विस्ट आणतो. ‘कल हो ना हो’ सिनेमाचा शेवटही त्याने वेगळा केला होता. त्यामुळे या सिनेमाचा शेवटही तो थोडा वेगळा करणार असे म्हटले जात आहे.

सिनेमात शाहरुख ऐश्वर्या रायचा नवरा दाखवण्यात आला आहे. शाहरुखचा काही कारणांमुळे मृत्यू होतो, त्यानंतर ऐश्वर्या आणि रणबीर यांच्यात जवळकी निर्माण होते. करणच्या या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. हा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा वेगळा असेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

‘रोमॅण्टिक ड्रामा’ प्रकारात येणाऱ्या या सिनेमामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान, अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट पाहता येणार आहे. एका गाण्याचा रुपात असणाऱ्या या टिझरमध्ये अभिनेता रणबीर कपूर गाणे गाताना दिसत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांची झलकही टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि त्यातून होणारा हिरमोड असे हटके कथानक हाताळत हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता रणबीर कपूर आणि फवाद खान नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. सध्या या दोन्ही अभिनेत्यांची त्यांच्या लूकसाठी चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एका वेगळ्याच भूमिकेत दिसणारी ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये रसिकांसाठी करण जोहर त्याच्या तगड्या स्टारकास्टसह ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 7:30 pm

Web Title: ranbir may not get his one sided love in ae dil hai mushkil
Next Stories
1 उलगडले दीपिकाच्या ‘पद्मावती’ सिनेमाचे रहस्य
2 ‘दंगल’साठी दलेर मेहंदीने गायले उत्साहवर्धक गाणे
3 ‘द रिंग’च्या सेटवर किंग खान आणि अब्रमामची धमाल
Just Now!
X