News Flash

‘अंदाज अपना अपना’मध्ये ही बॉलिवूड जोडी अमर-प्रेमच्या भूमिकेत?

यापूर्वी अमर प्रेमच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर, शाहिद कपूर, सुशांत सिंग राजपूत अशी नावं चर्चेत होती.

२५ वर्षांनंतरही ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे

साधरण पंचवीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटातील अमर- प्रेमची जोडी तर बॉलिवूडमधली हिट जोडी म्हणूनही ओळखली जाते. अमर -प्रेम या जोडीबरोबर रवीना- करिना, तेजा, भल्ला, आनंद अकेला, रॉबर्ट, क्राईम मास्टर गोगो या सगळ्याच पात्रानं प्रेक्षकांना अक्षरश: खळखळून हसवलं. खुशखबर म्हणजे या चित्रपटाचा रिमेक येत असून रणवीर आणि वरुण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा आहे.

प्रिती आणि विनय सिन्हा ‘अंदाज अपना अपना’ची निर्मीती करणार असल्याचं समजत आहे. मात्र हा चित्रपट ‘अंदाज अपना अपना’चा रिमेक किंवा सीक्वल नसेल अशी प्राथमिक माहिती या दोघांनी एका वेबसाइटला दिली आहे. नव्या अंदाज अपना अपनाची गोष्ट ही पूर्णपणे वेगळी असेल याचा आम्ही प्रयत्न करू असंही दोघं म्हणाले. २५ वर्षांनंतरही ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे त्याचा रिमेक काढणं हे जवळपास अशक्य आहे म्हणून आम्ही वेगळी गोष्ट घेऊन येणार असल्याची माहिती निर्मात्यानं दिली.

यासाठी त्यांनी वरुण आणि रणवीरची निवड केल्याचं समजत आहे. रणवीर आणि वरूण हे दोघंही विनोदी भूमिकेसाठी उत्तम आहेत. ऑफस्क्रीन या दोघांची चांगली गट्टीही आहे म्हणूनच ‘अंदाज अपना अपना’मध्ये ते तितक्याच सहजतेनं अभिनय करतील असं निर्मात्यांना वाटत आहे.  शक्ती कपूर यांनी या चित्रपटात साकारलेलं क्राइम मास्टर गोगो देखील या चित्रपटात नव्या अंदात दिसणार आहे. ही भूमिका शक्ती कपूरच पुन्हा एकदा साकारणार असल्याच्या चर्चा आहेत. यापूर्वी अमर प्रेमच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर, शाहिद कपूर, सुशांत सिंग राजपूत अशी नावं चर्चेत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 11:58 am

Web Title: ranveer singh and varun dhawan have been approached to play role in andaz apna apna reloaded
Next Stories
1 Photo : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब?
2 राष्ट्रपती भवनात होणार ‘मणिकर्णिका’चे स्पेशल स्क्रिनिंग
3 Video : राखी सावंतच्या कथित प्रियकराला भररस्त्यात मारहाण
Just Now!
X