उतरन, बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. सोशल मीडियावर सक्रीय असलेली रश्मी कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आज तिचा चाहतावर्गदेखील तितकाच मोठा असल्याचं पाहायला मिळतं. उत्तम अभिनयासोबतच रश्मी तिच्या स्वभावामुळेदेखील ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर रश्मीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात तिने छायाचित्रकारांसोबत जपलेलं मैत्रीचं नात दिसून येत आहे.

रश्मीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ तिच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मी तिच्या गाडीत गुजराती चकरी खाताना दिसत आहे. रश्मीचं लक्ष नसताना काही छायाचित्रकार तिचे फोटो काढण्यासाठी येतात आणि तिची विचारपूस करतात. विशेष म्हणजे अचानकपणे आलेल्या छायाचित्रकारांना पाहून रश्मी दचकते.मात्र, त्यानंतर ती छायाचित्रकारांशी छान गप्पा मारताना दिसून येते.

रश्मीला पाहून एक छायाचित्रकार तिच्या गाडीजवळ येत, ‘काय रश्मीजी कुठे चाललात? काय खाताय?’ असे प्रश्न विचारु लागला. अचानक आलेल्या छायाचित्रकाराला पाहून रश्मी दचकली आणि ‘काय पांडेजी काय करताय तुम्ही’, असं म्हणाली. सोबतच चकली नाही तर गुजराती चकरी खाते असंही तिने सांगितलं.

आणखी वाचा- “पतीची लक्षण ठिक नव्हती”; ३ वर्षात अभिनेत्रीने घेतला घटस्फोट

दरम्यान, सध्या रश्मीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वीदेखील रश्मी तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. रश्मी अलिकडेच ‘नागिन ४’ मध्ये झळकली होती.