News Flash

लॉकडाउनमध्ये अभिनेत्री बनवते चुलीवर जेवण, पाहा व्हिडीओ

ती लॉकडाउनमुळे बिहारमधील एका गावात अडकली आहे.

करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसे, दिग्गज आणि नामवंत व्यक्ती तसेच कलाकार मंडळी हे सर्वचजण घरामध्ये अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतील अभिनेत्री रतन राजपूत बिहारमधील एका गावामध्ये अडकली आहे. ती तिकडचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

रतन अशा गावामध्ये अडकली आहे जिथे तिला हव्या तशा सोयीसुविधांची कमतरता आहे. गावात टीव्ही नाही, अंघोळीसाठी बाथरूम नसल्याचेही तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. आता रतनने इन्स्टाग्रामवर चुलीवर जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

रतनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चुलीवर भात आणि भाजी बनवताना दिसत आहे. तसेच तिने हे पदार्थ कसे बनवले याची रिसेपी देखील ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

लॉकडाउन सुरु होण्याआधी रतन तिच्या गावी फिरायला गेली होती. अचानक २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउनची घोषणा केली आणि ती तिथेच अडकली. रतनने सोयीसुविधा नसलेल्या गावात राहातानाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 5:38 pm

Web Title: ratan rajput used chulha for making kadi chawal avb 95
Next Stories
1 बिग बॉसच्या घरात मेकअप केल्याविना कोणाला पाठवशील? आलिया भट्ट म्हणाली…
2 गोरगरिब आणि गरजूंसाठी गायत्री दातारने पुढे केला मदतीचा हात
3 “ही माणसं केवळ मार खाण्यास पात्र”; दारुच्या दुकानांवर संतापला अभिनेता
Just Now!
X