‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दत्ताची बायको सरिता एकदमच बदलली. गेल्या काही भागांमध्ये तिचं बदललेलं रूप पाहायला मिळतंय. यामुळेच तिची सासू बाहेरची बाधा झाली असेल या अंधश्रद्धेनं तिच्यावरून नारळ ओवाळून टाकते. पण काही घडामोडींमुळे मालिकेच्या पुढील भागांत अण्णा सरिताला घराबाहेरून काढणार का असा प्रश्न निर्माण होतो.
सरिताला आपण आपल्या जाळ्यात ओढलं आहे असं वच्छी आणि तिच्या सुनेला वाटतं. सरितानं काशीच्या उपचारासाठी तिच्याकडचे पैसे दिले. तेव्हापासून वच्छी सरिताला नाईकांविरोधात भडकावत आहे. सरिताला हाताशी घेऊन आपण बरंच काही करू शकतो असं वच्छिला वाटतं. पण मालिकेत एक वेगळं वळण येणार आहे. त्याची झलक या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.
'ज्याचा करुचा भला, तो म्हणता आपलाच खरा' अशी गत हा छायाची. #RatrisKhelChale2 #ZeeMarathi pic.twitter.com/P88BbA9VpA
— Zee Marathi (@zeemarathi) April 11, 2019
वच्छी काय खेळ खेळतेय, हे सरिताला उमजतं. वच्छी नाईकांच्या वाड्याचं वाईट करायला बसलीय, हेही तिला कळतं. त्यामुळे आता ती पुढच्या भागात सरिता वच्छीच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या सुनेला सुनावते. आमच्या वाड्याकडे वाईट नजरेनं पाहिलंस तर याद राख असा इशाराच देते.
मालिकेच्या पुढच्या भागात वच्छी आणि तिची सून नाईकांच्या वाड्यावर येऊन सरिताबद्दल मुद्दाम सांगून जातात. सरिता त्यांच्या संपर्कात आहे हे समजल्यावर अण्णा तिला घराबाहेर काढतील का, सरिताची सासू तिला यातून वाचवेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.