News Flash

अश्लिल प्रतिक्रिया देणा-यांची अभिनेत्रीने केली बोलती बंद

काही नेटिझन्सनी तर मर्यादेची पातळी ओलांडत तिला वेश्या असेही म्हटले.

Nia Sharma निया शर्मा

टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्मा हिने तिच्या व्हिडिओवर अश्लिल प्रतिक्रिया करणा-यांना चोख उत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच निया शर्माने नुकत्याच फोटोशूट केलेल्या काही डान्स मुव्हजचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल साइटवर टाकला होता. तिचा हा व्हिडिओ आतापर्यंत तीस हजार जणांनी पाहिला आहे. नियाचे इन्स्टाग्रामवर जवळपास सात लाख फोलोअर्स आहेत.

नियाच्या फोलोअर्सपैकी काहींनी तिच्या या व्हिडिओची प्रशंसा केली आणि तिच्या टॅलेण्टला नावाजले सुद्धा. तर काहींनी तिच्या या व्हडिओवर अश्लिल प्रतिक्रिया दिल्या. एका नेटिझनने लिहले की, या पोस्टला पाहून तिच्या (नियाचे) आई-वडिलांवर लाजिरवाणी परिस्थिती ओढावली असेल. इतकेच नव्हे तर काही नेटिझन्सनी तर मर्यादेची पातळी ओलांडत तिला वेश्या असेही म्हटले. यानंतर नियाने काही फोलोअर्सना ब्लॉक केले. पण, नेटिझन्सच्या अश्लिल प्रतिक्रियांनी ती घाबरली नाही. तिने सदर व्हिडिओचे कॅप्शन एडिट करुन सर्वांना उत्तर दिले.

मुख्य म्हणजे त्यानंतर नियाने सदर व्हिडिओशी निगडीत आणखी एक व्हिडिओ लगेच शेअर केला. त्यावर तिने लिहिलेय की, उप्स.. फोटोशूटमधील आणखी एक व्हिडिओ. एका मुलीला शिवीगाळ करण्यास तयार आहात? असेच चालू देत. मी अजून पाच व्हिडिओ टाकणार. कारण, याचकरिता मी शूट केले आहे. त्यामुळे मी यातील काही फोटोसुद्धा शेअर करणार आहे. माझ्या आधिच्या व्हिडिओवरून, माझ्या आयुष्यावर वाईट आणि अश्लिल कमेन्ट करणा-यांची मी प्रशंसा करते. मी तुम्हाला पुन्हा एकदा कामाला लावलेय.

nia-sharma-support

nia-sharma-slut-shamed

दरम्यान, ‘जमाई राजा’ या मालिकेमध्ये रोशनी खुरानाची भूमिका साकारलेल्या नियाने बॉलिवूडमधील भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. आशियातील सर्वाधिक सौंदर्यवतीची निवड करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी इस्टर्न आय च्या वतीने जनमत कौल घेण्यात आला होता. यामध्ये दीपिकाने बाजी मारली होती. मात्र, मादक सौदर्यवतीमध्ये तिसरे स्थान मिळवून टीव्ही कलाकार निया शर्माने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या आलिया भट्ट तसेच कतरिना कैफ यांना मागे टाकून नियाने स्वत:ला सिद्ध केले होते. नियाचे इन्स्टाग्रामवरील फोटो तिला मिळालेला बहुमान योग्य असल्याचे दाखवून देतात. निया ही सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेली काही छायाचित्रे तिची निवड अगदी योग्य असल्याचा पुरावाच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 7:05 pm

Web Title: ready to slut shame a girl again nia sharma shuts down trolls with another music video
Next Stories
1 फेअरनेस क्रीम ब्रॅण्डचे नाव ऐकताच बॉलीवूड अभिनेत्रीने नाकारला कार्यक्रम
2 ‘लाईफ, लेडिज अॅण्ड मुव्हीज…’ अन् रणबीर-सैफच्या गप्पा
3 ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X