24 September 2020

News Flash

सुशांत आणि बहिणीमधील वादात रिया करत होती मध्यस्थीचा प्रयत्न; सुशांतचे मेसेज आले समोर

"तुला तुझ्या अहंकारामुळे काही दिसतच नसेल तर..."

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतबरोबर झालेल्या व्हॉट्सअप संवादाचे स्क्रीनशॉर्ट जारी केले आहेत. व्हॉट्सअपवरील या चर्चेमध्ये सुशांत आपली बहीण प्रियंकाकडून रियाला मिळणाऱ्या वागणूकीसंदर्भात बोलताना दिसत आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी रियानेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतरच रियाने हे स्क्रीनशॉर्ट इंडिया टुडेबरोबर शेअर केले आहेत.

रियाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये सुशांत त्याच्या बहिणीबद्दल रियाकडे तक्रार करताना दिसत आहे. या स्क्रीनशॉर्टमधील मजकुरानुसार, “माझी बहीण माझ्या मित्रांना आणि रुममेट असणाऱ्या सिद्धार्थ पिठाणीला माझ्याविरोधात भडकत आहे”, असं सुशांत रियाला सांगत आहे. सुशात रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करत असल्याचे स्क्रीनशॉर्टमध्ये दिसून येते. “तुझं कुटुंब एकदम भारी आहे. शौविक अगदी साधा आहे आणि तू सुद्धा. तू माझी आहेस. माझ्या मधील बदलाचे तू कारण आहेस. तू मला प्रत्येक वेळी मार्ग दाखवतेस. या सर्व बदलांमागे तुझा हात आहे. तुमच्यासारखी लोकं माझ्या जवळ आहेत ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तुमच्यासारखी लोकं मला मित्र म्हणून आनंद देतात,” असं सुशांतने म्हटल्याचे स्क्रीनशॉर्टमध्ये दिसत आहे.

रियाचे कौतुक

या पुढील मेसेजमध्ये सुशांतने, “तू हसताना खूप छान दिसतेस. तशीच तू मला आवडतेस. मी आता झोपण्याचा प्रयत्न करत आहे. अपेक्षा आहे की मला छान स्वप्न पडतील. हे स्वप्न एकदम अद्भभुत असेल का? बाय,” असं सुशांतने म्हटलं आहे. “हा हा.. झोप तू.. विमान उतरल्यानंतर मी तुला कॉल करते आणि अपेक्षा आहे तू चंद्रावर लॅण्ड करशील. झोप तू स्वीट बॉय,” असा रिप्लाय यावर रियाने दिला आहे.

सिद्धार्थ पिठाणीला भडकवण्याचा प्रयत्न

त्यानंतर रियाने सुशांतची चौकशी करण्यासाठी मेसेज केला. त्यावर सुशांतने, “फारसा ठीक नाहीय मी. माझी बहीण सिडला भडकवत आहे. (तू आणि मी जी गोष्ट मागे सोडून आलो आहे) त्यावरुन लक्ष विचलित करुन मी तिला तिच्या वागणूकीसाठी शिक्षा केल्याचे म्हणत आहे. हे खूपच निराशाजनक आहे,” असा रिप्लाय केला.

देव आणि वेळच सांगेल की…

सुशातने प्रियंकाला पाठवलेला मेसेज रियाला पाठवल्याचे दिसत आहे. यामध्ये तो लिहितो, “(प्रियंकासाठी) दारुच्या नशेमध्ये केलेल्या छेडछाडीनंतर तू व्हिक्टीम गेम खेळत असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेस. तर माझ्या लाडक्या बहिणीला मी इतकचं सांगू इच्छितो की तिथे वर आपली लाडकी आई आणि देव आहे ज्यांनी मला शिकवलं आहे त्याप्रमाणे तू एक गुन्हा केला आहेस. तर तुला तुझ्या अहंकारामुळे काही दिसतच नसेल तर देवच तुझं भलं करो. मी कोणाला घाबरत नाही आणि मी या पुढेही हे काम कर राहणार. मी जगामध्ये नक्कीच बदल घडवत राहणार. देव आणि वेळच सांगेल कोणाचं काम योग्य आहे.”

पुढील स्क्रीनशॉर्टमध्ये रिया जाण्याआधी मी तुला भेटायला येते आणि आपण या विषयावर नक्की तोडगा काढू असं सुशांतला सांगाना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 12:55 pm

Web Title: rhea chakraborty shares whatsapp messages with sushant singh rajput scsg 91
Next Stories
1 रंगभूमी दिग्दर्शक पीतांबरलाल रजनी यांचं करोनामुळे निधन
2 आराध्या बच्चन घेते ऑनलाइन हिंदी विषयाचे धडे, व्हिडीओ व्हायरल
3 सुशांत आणि दिशाने केली होती ‘पब्जी’बद्दल चर्चा; समोर आला दोघांमधील Whatsapp संवाद
Just Now!
X