News Flash

ऋषी कपूरने केली अमिताभ बच्चनची चुक दुरुस्त

बॉलीवूडच्या महानायकाची ट्विट करताना झाली लहानशी चुक

बरेच बॉलीवूड कलाकार सोशल नेटवर्किंग साइट्सवर सतत काही ना काही पोस्ट करत असतात. ज्यामुळे त्यांच्या विविध पोस्टविषयी सगळ्यांनाच कुतूहल असते. ट्विटर हे असेच एक सोशल माध्यम आहे, जिथे अनेक नामवंत कलाकार बऱ्याच पोस्ट करत साऱ्यांच्याच संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या कलाकारांमधले एक नाव म्हणजे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन. नेहमीच काही जुने फोटो किंवा महत्त्वाच्या विषयांवर ट्विट करणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विट्सना त्यांच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांकडूनही मोठ्या प्रमाणात फॉलो केले जाते.
स्पष्ट आणि अचूक विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलीवूडच्या महानायकाची या वेळी ट्विट करताना लहानशी चुक झाल्याचे दिसते. ‘बिग बीं’कडून झालेल्या या चुकीची नोंद तुम्ही आम्ही नाही तर अभिनेता ऋषी कपूरने घेतली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी अग्रगण्य असणाऱ्या ‘कपूर’ घराण्याशी निगडीत एका फोटोला अमिताभ यांनी ट्विट केले होते. या फोटोखाली त्यांनी वर्णनात्मक ओळी लिहिताना ‘राज कपूर, शशी कपूर आणि शम्मी कपूर त्यांच्या आईसमवेत बसले असता टिपलेला क्षण’ अशा आशयाचे विधान लिहिले. पण, याच विधानातील चूक लक्षात आणत आदरपूर्वक शब्दांत ‘फोटोतील ती आमची नातेवाईक उर्मिला सिआल आहे’ असे सांगितले आणि चुकीची दुरुस्ती केली. अमिताभ बच्चन यांच्याकडून झालेल्या चुकीची ट्विटवर बरीच चर्चा झाल्याची हवाही चित्रपट वर्तुळात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 4:45 pm

Web Title: rishi kapoor corrects amitbah bachchan on wrong caption for kapoor family pic
Next Stories
1 VIDEO: वरुण धवन झाला ‘देवदास’
2 दिलजीत दोसांझ आणि परिणिती साकारणार ‘चमेली की शादी’
3 पुद्दुचेरीत सार्वजनिक सुविधांचा वापर करणाऱ्यांना सरकारने दिली ‘कबाली’ चित्रपटाची तिकिटे
Just Now!
X