29 September 2020

News Flash

…म्हणून ऋषी कपूर- माधुरीने बुरखा घालून केला ‘तो’ प्रवास

काळ बदलला त्याप्रमाणे चित्रीकरणाच्या पद्धतींपासून ते चित्रपटांच्या विषयांपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्या.

ऋषी कपूर, माधुरी दीक्षित

हिंदी कलाविश्वात आजवर बऱ्याच चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं आहे. काळ बदलला त्याप्रमाणे चित्रीकरणाच्या पद्धतींपासून ते चित्रपटांच्या विषयांपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्या. या साऱ्यामध्ये एक गोष्ट वर्षानुवर्षांनंतरही तितकीच रंजक होत गेली. ती गोष्ट म्हणजे जुन्या आठवणी. अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी अशाच एका आठवणीला उजाळा दिला.

‘याराना’ या चित्रपटाच्या वेळचा तो किस्सा आणि त्या आठवणी पुन्हा एकदा जुन्या स्मृतींना उजाळा देऊन गेला. हैदराबादयेथील एका प्रवासादरम्यान, ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी बुरखा घालत प्रवास केला होता. लोकप्रियता आणि प्रेक्षकांची होणारी गर्दी पाहता त्यांनी अशा प्रकारे प्रवास करण्यास प्राधान्य दिलं होतं. मुख्य म्हणजे त्या काळात अनेक सेलिब्रिटी गर्दीच्या ठिकाणी वावरतेवेळी किंवा प्रवासादरम्यान बुरखा वापरत असत. पण, हा किस्सा खास ठरण्याचं कारण म्हणजे बुरखा पडल्यामुळे या कलाकार मंडळींचं गुपित सर्वांसमोर उघड झालं होतं.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

सोशल मीडियावर झालेल्या संवादामध्ये खुद्द ऋषी कपूर यांनीच याविषयीचं गुपित उलगडत हा किस्सा सांगितला. मला आपल्यासोबतचा तो किस्सा आठवतोय. जेव्हा आपण दोघंही बुरखा घालून हैदराबादसाठीच्या प्रवासाला निघालो होतो. तेव्हाच माझा बुरखा खाली पडला होता आणि पुणे स्थानकातील सर्वच प्रवाशांनी आपल्याला पाहिलं होतं. त्या पुढच्या प्रवासाविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच, असंही त्यांनी या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं. आहे की नाही हा रंजक किस्सा?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 5:29 pm

Web Title: rishi kapoor madhuri dixit burqa yaarana movie bollywood
Next Stories
1 दहीहंडी फोडणाऱ्या शाहरुखवर उलेमांची तीव्र नाराजी
2 शाहिद- मीराच्या मुलाचं नाव….
3 नव्या इनिंगच्या तयारीत वरुण
Just Now!
X