26 जुलै 1999 मध्ये भारतानं कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारली होती. याला 22 वर्ष पूर्ण झालीत. कारगिल युद्धाचा थरार रूपेरी पडद्यावरही प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला. हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्याही अंगावर रोमांच उभे राहतात. त्यातलाच एक ‘LOC कारगिल’. खरं तर बॉलिवूडमध्ये ‘बॉर्डर’, ‘द गाझी अटॅक’ असे कित्येक युद्धपट आले; परंतु ‘LOC कारगिलट’ हा एक थरारक अनुभव देणारा रोमांचकारी असा चित्रपट आहे. कारगिल युद्धात मरण पावलेल्या हुतात्म्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले होते. कारगिल युद्धाचा इतिहास अगदी जवळून पहायचा असेल तर आजही अनेक प्रेक्षक हा चित्रपट आवडीने पाहतात. याच चित्रपटातल्या काही आठवणी अभिनेता रोहित रॉयने शेअर केल्या आहेत.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता रोहित रॉयने या चित्रपटातील आठवणी ताज्या केल्या. ‘एलओसी कारगिल’ चित्रपटात अभिनेता रोहित रॉयने कॅप्टन शशी भूषण ही भूमिका साकारली होती. ४ तास १५ मिनीटांच्या या चित्रपटाच्या यशामागचं रहस्य म्हणजे चित्रपटासाठी खोलवर जाऊन केलेलं संशोधन हे होय. या चित्रपटाचं दिग्दर्शन जे.पी. दत्ता यांनी केलंय. या चित्रपटात त्यांनी कोणत्याच अभिनेत्यांना साधे कपडे परिधान करण्यास मनाईल केली होती. संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांनी सगळ्या अभिनेत्यांना आर्मीची वर्दीच परिधान करण्यासाठी सांगितलं होतं, असं अभिनेता रोहित रॉयने सांगितलं. यामागचं कारणही सांगत अभिनेता रोहित रॉय पुढे म्हणाला, “जोपर्यंत तुम्ही एकाला सैनिकाच्या भूमिकेत स्वतःमध्ये रुजवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही पडद्यावर सैनिकाची भूमिका साकारू शकत नाहीत. सैनिकाची वर्दी सतत अंगावर असल्याने आपोआप आपल्या चालण्या-बोलण्याची पद्धत बदलून जाते”, असा अनुभव सुद्धा अभिनेता रोहित रॉयने व्यक्त केला.


या चित्रपटात जवळपास ३० कलाकार होते. हे सगळे कलाकार चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी कधीच कुणाला त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारत नसायचे, असं देखील अभिनेत्री रोहित रॉय म्हणाला. हे सगळे कलाकार एकमेकांना सेनेतील त्यांच्या पदांच्या नावानेच त्यांना संबोधत असतं. याविषयी बोलताना अभिनेता रोहित रॉय म्हणाला, “अभिषेक बच्चनला बोलताना आम्ही त्याला कमांडर म्हणून हाक मारत असायचो. तसंच सेटवर भेटल्या भेटल्या आम्ही एकमेकांना सलामी देखील देत होतो.”


यापूढे बोलताना अभिनेता रोहित रॉय म्हणाला, ” वास्तवमध्ये कोणत्याही युद्धात कधी रीटेक होत नसतो. कारगिल युद्धातील खरे हिरो आम्हा अभिनेत्यांचे कायम प्रेरणास्त्रोत असतात. या रिअल लाईफ हिरोंच्या संघर्षगाथा ऐकल्यानंतर आम्हा कलाकारांच्या सुद्धा अंगावर शहारे येतात.”