डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा सिनेमा पाचव्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. आत्तापर्यंतचा रोहित शेट्टीचा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरण्याची चिन्ह दिसत आहेत. पोलिस अधिकाऱ्या भोवती फिरणारे कथानक असणाऱ्या या सिनेमाच्या यशानंतर रोहित शेट्टी नुकताच मुंबई पोलिसांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उमंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला. सिनेमामधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रोहितने येथे केलेल्या एका घोषणेने त्याने पोलिसांचीही मने जिंकली. रोहितने ‘सिम्बा’ सिनेमाच्या कमाईमधील ५१ लाख रुपये मुंबई पोलिस कल्याण निधीसाठी दिले आहेत.

रोहित, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण यांनी ‘रोहित शेट्टी पिचर्स’ या ‘सिम्बा’च्या निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या वतीने मुंबई पोलिसांना ५१ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. पोलिसांच्या वतीने पोलिस आयुक्तांने स्वीकारला. ‘सिम्बा’च्या आधी रोहितनेच दिग्दर्शित केलेले आणि पोलिस अधिकाऱ्यांसंदर्भातील कथानक असलेले ‘सिंघम’ (२०११), ‘सिंघम रिटर्न्स’ (२०१४) या सिनेमांनीही तिकीटबारीवर चांगली कामगिरी केली होती. तर मागील महिन्यामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ने पाच आठवड्यांमध्ये २३९ कोटींची कमाई केली आहे. या वर्षी रोहित शेट्टी अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणारा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमामध्ये अक्षय एटीएस प्रमुखांच्या भूमिकेमध्ये दिसेल.

पोलिसांना ५१ लाखांचा धनादेश सुपूर्द केला

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘उमंग २०१९’ हा सांस्कृतिक मोहोत्सव मोठ्या उथ्साहामध्ये पार पडला. दिवस-ऱात्र मुंबईसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या मनोरंजनासाठी अनेक बड्या बॉलिवूड स्टार्सने आवर्जून हजेरी लावली. अमिताभ बच्चन, आलिया भट, रणबीर कपूर, कतरीना कैफ, जान्हवी कपूर, सारा अली खान, विकी कौशल, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, जॅकलीन फर्नांडिस, फरहान अख्तर, कार्तिक आर्यन, कार्तिक आर्यन, शिल्पा शेट्टी, कार्ती सॅनॉन, तब्बू, उर्मिला मातोंडकर, यामी गौतम, नोरा फतेही, सुशांत सिंग राजपूत, रविना तंडन, अनिल कपूर, अयुष्मान खुराना, परिणिती चोप्रा आणि सचिन तेंडूलकर असे अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते.