01 October 2020

News Flash

रोहित शेट्टी म्हणतोय…. म्हणून साराला दिलं ‘सिम्बा’मध्ये काम

'सारा सतत मला मेसेज करून कामाबद्दल विचारायची. मी तिच्या एकाही मेसेजला उत्तर दिलं नव्हतं.'

अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खाननं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलं. तिचा ‘केदारनाथ’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला याच महिन्यात तिचा ‘सिम्बा’ चित्रपटही प्रदर्शित होत आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ मध्ये सारासोबत रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे ‘केदारनाथ’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होऊन अवघे काही दिवस उलटले असताना तिला ‘सिम्बा’साठी विचारण्यात आलं.

सारा स्टारकिड असली तरी सिम्बासाठी तिची निवड कशी झाली असा प्रश्न नुकताच रोहित शेट्टीला विचारण्यात आला, त्यावर त्यानं एक मजेशीर किस्सा सांगितला. साराला चित्रपटात काम देण्याचा विचार चुकूनही माझ्या डोक्यात आला नव्हता. मात्र सारा सतत मला मेसेज करून कामाबद्दल विचारायची. मी तिच्या एकाही मेसेजला उत्तर दिलं नव्हतं. अखेर तिचा प्रयत्न पाहून मी तिच्याबद्दल माहिती काढली. ती त्यावेळी अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ चित्रपटात काम करत होती. चित्रपटातील काही दृश्य चित्रीत झाली होती. मी ती पाहिली आणि तिला लगेच काम देण्याचं ठरवलं, असं रोहित शेट्टी म्हणाला.

कामासाठी मी देखील रोहित शेट्टीला अनेकदा मेसेज केले होते पण त्यांनी उत्तर दिलं नाही असंही सारानंही मान्य केलं होतं. साराच्या ‘केदारनाथ’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तिचा सिम्बा हा चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:59 pm

Web Title: rohit shetty reveals how sara ali khan get role in simmba
Next Stories
1 लग्नातील उरलेलं अन्न वाया न घालवता कपिलनं ते गरीबांना केलं दान
2 ‘झिरो’ फ्लॉप झाला तर पुढे काम मिळणं कठीण; शाहरुखला सतावतेय चिंता
3 टायगर पुन्हा होणार ‘बागी’, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Just Now!
X