यंदाचे वर्ष वेब विश्वातून सादर केल्या गेलेल्या कन्टेन्टच्या बाबतीत अद्वितीय राहिले आहे. २०२० मधील काही सर्वात मोठ्या शोजमध्ये वूट सिलेक्टच्या शोजचा देखील समावेश होता. आता वूट सिलेक्टच्या २०२१ मधील लाइन अपबाबत उत्सुकता व अपेक्षा वाढली असताना ‘कँडी’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘कँडी’ या सीरिजची कथा राजकारण, महत्त्वाकांक्षा, हत्या, कटकारस्थान यांभोवती फिरते. यामध्ये रिचा चड्डा व रोनित रॉय यांची प्रमुख भूमिका असून ‘कँडी’ निश्चितच प्रेक्षकांना रहस्यांचा उलगडा करण्याच्या रोमांचक प्रवासावर घेऊन जाईल.
याबाबत बोलताना रोनित रॉय म्हणाला, ”मला प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच नशीबवान आहे. यामुळे मला भरपूर शिकण्यामध्ये मदत झाली आहे.” तर रिचा चड्डा म्हणाली, ”मला या पटकथेकडे आकर्षून घेतलेली बाब म्हणजे शोमधील माझ्या भूमिकेत असलेल्या विविध छटा. ही थ्रिलर/ सायकोलॉजिकल हॉरर शैली माझ्यासाठी नवीन आहे. सखोलता असलेल्या भूमिका साकारण्याकडे मी नेहमीच आकर्षून गेले आहे आणि ही अगदी परिपूर्ण संधी होती.”
रोनित रॉय व रिचा चड्ढासोबतच यामध्ये मनु रिषी चढ्डा व नकुल सहदेव यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सीरिजचे दिग्दर्शन आशिष आर. शुक्ला यांनी केले असून ऑप्टिमिस्टिक्स एंटरटेन्मेंटची निर्मिती आहे. वूट सिलेक्टवर ‘कँडी’ ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 6:00 pm