‘क्यूं की सास भी कभी बहु थी’ या मालिकेतील अभिनेता रॉनित रॉय हा टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वात चांगलाच प्रसिद्ध आहे. लॉकडाउनमुळे अनेक कलाकारांची आर्थिक स्थिती खालावली. कर्जाच्या ओझ्यामुळे, नैराश्यामुळे काही कलाकारांनी आत्महत्यासुद्धा केली. मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे खचून न जाता सकारात्मक दृष्टीकोन ठेवत लढा देण्याचा सल्ला रॉनित रॉय या कलाकारांना देतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रॉनितने दोन वर्षे आमिर खानच्या बॉडीगार्डचं काम केल्याचा खुलासा केला.
‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत रॉनित म्हणाला, “आमिर खानच्या बॉडीगार्डचं काम केल्यामुळे मला कामाबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या. दोन वर्षे मी आमिर खानसोबत होतो. माझ्याकडे कुठलंही काम नव्हतं. त्यामुळे मी स्वत:ची कंपनी सुरू केली आणि आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं. कामाप्रती निष्ठा काय असते हे मला आमिरकडून शिकायला मिळालं. आमिरने माझी खूप मदत केली. त्याच्यामुळे मी मोठं घर आणि मोठी गाडी यांचा विचार न करता माझ्या अभिनय कौशल्यावर लक्ष केंद्रीत करू लागलो.”
आणखी वाचा : प्रसिद्ध गायक लकी अली यांनी ५२व्या वर्षी केलं तिसरं लग्न; आता करत आहेत शेती
या मुलाखतीत रॉनितने त्याच्या संघर्षातील एक किस्सा सांगितला. “रॉनितला भूमिका देण्यापेक्षा मी एखाद्या ज्युनिअर आर्टिस्टला काम देईन असं एका दिग्दर्शकाने माझ्या मॅनेजरला सांगितलं. ते मी कधीच विसरू शकत नाही. ते शब्द फार त्रासदायक होते. पण त्यानंतर मी स्वत:च्या अभिनय कौशल्यावर अधिक लक्ष देऊन काम करू लागलो. काही वर्षांनी त्याच दिग्दर्शकाने मला चित्रपटातील भूमिकेची ऑफर दिली होती. पण ती भूमिका चांगली न वाटल्याने मी साफ नकार दिला होता.”
‘अग्ली’, ‘उडान’ यांच्यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा रॉनित नुकताच ‘हॉस्टेजेस’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये झळकला.