02 March 2021

News Flash

‘मन्नत विकणार आहेस का?’; नेटकऱ्याच्या प्रश्नाला शाहरुखनं दिल प्रेरणादायी उत्तर

चाहत्याने व्यक्त केली मन्नत बंगला खरेदी करण्याची इच्छा; शाहरुख म्हणाला...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानकडे आजच्या घडीला बंगला, विविध प्रकारच्या गाड्या अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पण, दिल्लीहून आपलं करिअर करण्यासाठी हा अभिनेता मुंबईत आला होता, तेव्हा त्याच्या खिशात निव्वळ ३०० रुपये होते. शिवाय राहायला घरही नव्हते. आज हाच अभिनेता कोट्यवधी किंमत असलेल्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यात राहतो. शाहरुख एवढाच त्याचा आलिशान ‘मन्नत’ बंगलाही प्रसिद्ध आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

नुकतेच एका चाहत्याने हा बंगला तू विकणार आहेस का? असा सवाल त्याला केला. नेटकऱ्याच्या या चकित करणाऱ्या प्रश्नावर शाहरुखने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. “भावा मन्नत (देवाकडे काही तरी मागणं वा मनाशी केलेला संकल्प) विकत घेता येत नाही, तर विनम्रपणे मागायची असते. हे वाक्य कायम स्मरणात ठेव. आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवशील.” असं सल्ला शाहरुखने त्याला दिला.

सर्वाधिक वाचकपसंती – ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

१९९५ साली विकत घेतलेल्या बंगल्याला शाहरुखने ‘मन्नत’ हे नाव दिले. त्याकाळी त्याने १५ कोटींना घेतलेल्या या बंगल्याची आताची किंमत तुम्हाला तोंडात बोटं घालण्यास भाग पाडेल. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये इतकी आहे. ६००० चौरस फुटांच्या या बंगल्यात बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहे. या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 7:40 pm

Web Title: rukh khan if he is selling his home mannat actors response mppg 94
Next Stories
1 कपिल शर्मा शोनंतर मुकेश खन्ना यांचा ‘लक्ष्मी बॉम्ब’वर निशाणा
2 ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेतून मोनिका बागुल करणार छोट्या पडद्यावर पदार्पण
3 श्वेता तिवारीवर आर्थिक फसवणूकीचा आरोप; शिक्षकानं दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
Just Now!
X