04 June 2020

News Flash

फ्लॅशबॅक: …आणि सचिन तेंडुलकर अवतरला

वातावरणात रंगत वाढत असतानाच सगळ्यांनाच 'जोरका झटका धीरेसे लगा'.... चक्क सचिन तेंडुलकचे आगमन झाले.

सचिन तेव्हा तो तेव्हा क्रिकेटमधला वेगाने प्रकाशात राहणारा तारा होता.

हिंदी चित्रपटाचा ‘मुहूर्त सोहळा’ ही पूर्वी फार मोठी व त्या सिनेमावाल्यांच्या आनंदाला प्रचंड भरती येणारी अशी अफलातून संस्कृती होती. त्यासाठी वावरताना मिळणारा ‘फिल’ काही वेगळाच असे.. मेहबूब स्टुडिओत राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’चा १९९० च्या ऑक्टोबरमधला मुहूर्त त्याच ‘चारीं’चा! संतोषी या चित्रपटापासून विनोदपटाकडे वळल्याने मुहूर्त दृश्यात तो कसे हसवतोय हे जसे महत्त्वाचे तसेच त्यावेळी नावारूपाला येत असलेल्या आमिर-सलमान-करिश्मा-रविना अशा चौघांना त्याने एकत्र आणले म्हणून कौतुकाचे व कुतूहलाचेही. निर्माता विनय सिन्हाही उत्साहात, त्याच्यामुळे काही मराठी सिनेमावालेही हजर होते. वातावरणात रंगत वाढत असतानाच सगळ्यांनाच ‘जोरका झटका धीरेसे लगा’…. चक्क सचिन तेंडुलकचे आगमन झाले. तो तेव्हा क्रिकेटमधला वेगाने प्रकाशात राहणारा तारा होता. वागण्यात केवढी तरी नम्रता, ‘गले लगावो’ अशा फिल्मी संस्कृतीत सचिनची पावले मात्र वेगळी पडत होती आणि त्याच्या आगमनामुळे प्रत्येकजण ‘अंदाज अपना अपना’ जणू व्यक्त करीत आहेत  हे त्यांच्या चेहऱयावर दिसत होते. करिश्माचा आनंद तर केवढा बघा, आमिर तसा लहानपणापासून क्रिकेट वेडा, वांद्र्याच्या पाली हिलवर गली क्रिकेटचा आनंद घेत मोठा झालेला. याक्षणी फोटोग्राफर्सना  उत्तम छायाचित्र लाभले तेव्हा असे छायाचित्र हिच बातमी असे त्यामुळे सचिनचा त्यावेळचा वावर आणि थोड्या वेळातच सेटबाहेर पडणे हाच मजकूराचा ‘आँखो देखा हाल’ ठरला…सचिन मेहबूबबाहेर पडला तरी त्याचे या मुहूर्ताच्या वेळचे त्याचे अस्तित्व जाणवत होते. कुठेही असला तरी सचिनच ‘सबसे बडा खिलाडी’..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:10 am

Web Title: sachin tendulkar attend andaz apna apna movie function
टॅग Sachin Tendulkar
Next Stories
1 अनुराग कश्यपकडून मला प्रेरणा – सुधीर मिश्रा
2 शाहीद म्हणतो, प्रियांका टॉप फॉर्ममध्ये
3 आमिरने कडेकोट सुरक्षेत सहकुटुंब पाहिला ‘स्टार वॉर्स’
Just Now!
X