News Flash

‘पीके’च्या स्क्रिनिंगला राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकरची हजेरी

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित 'पीके' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांनी गाजत आहे.

| December 17, 2014 08:45 am

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांनी गाजत आहे. यामध्ये आता आणखी एका कारणाची भर पडली आहे. कारण, या चित्रपटाच्या मुंबईत पार पडलेल्या विशेष स्क्रिनिंग सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब हजेरी लावली होती. राजकारण आणि क्रिकेटमधील या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे ‘पीके’च्या स्क्रिनिंग सोहळ्याला विशेष रंगत आली होती. चित्रपटागणिक बदलणारा आमिरचा लूक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. वैविध्यपूर्ण आणि हटके कथानक हे आमिरच्या आजवरच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य राहिल्यामुळे तमाम बॉलिवूडकरांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. राज ठाकरे आणि आमिर खान यांनी चित्रपटाचे आणि आमिर खानचे तोंडभरून कौतूक केले.
आमिर खान आणि राजू हिरानी यांनी आजवर नेहमीच वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा, असे राज यांनी सांगितले. तर, सचिन तेंडुलकरने आमिरच्या कारकिर्दितील हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून ‘पीके’चे कौतूक केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2014 8:45 am

Web Title: sachin tendulkar raj thackeray attend pk movie screening
Next Stories
1 सवाई गंधर्व महोत्सवात गायला मिळणे, हे माझे स्वप्न -अनिरुद्ध जोशी
2 थोडसं ‘मराठा मंदिर’ चित्रपटगृहाविषयी…
3 पाहा ‘रॉय’चा ट्रेलर: रणबीर, जॅकलिन, अर्जुन रामपाल प्रेमाचा त्रिकोण?
Just Now!
X