04 July 2020

News Flash

विनोदवीर सागर कारंडे लॉकडाउनमध्ये घेतोय ‘हे’ ऑनलाइन धडे

चित्रीकरणाच्या व्यग्र वेळापत्रकातून मिळालेली ही मोठी सुट्टीच आहे.

सागर कारंडे

लॉकडाऊनमुळे मालिकांचं चित्रीकरण बंद असून सर्व कलाकार देखील घरी त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. चित्रीकरणाच्या त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून मिळालेली ही मोठी सुट्टीच आहे. त्यात अनेक कलाकार त्यांची आवड-निवड जोपासत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमातील त्यांचा लाडका विनोदवीर सागर कारंडे सध्या त्याच्या कुटुंबाला मनसोक्त वेळ देतोय.

या मिळालेल्या मोकळ्या वेळात सागर अजून काय करतोय हे विचारल्यावर तो म्हणाला, “मी नवनवीन गोष्टी शिकतोय. पहिलं म्हणजे स्वयंपाक. सुरुवातीला मला फक्त ऑमलेट बनवता येत होतं पण आता मी बऱ्यापैकी स्वयंपाक करू शकतो. हळद-मिठाचं प्रमाण देखील आता मला कळू लागलं आहे. आधी माझे खूप सारे प्रयोग फसले पण आता हळू-हळू मला अंदाज येऊ लागला आहे. शिवाय मी गिटारचे ऑनलाईन धडे गिरवतोय. आधीपासून मी गिटार शिकत होतो पण नंतर वेळ मिळत नव्हता. गिटार देखील बरेच दिवस धूळ खात पडली होती. सध्या माझा मित्र चैतन्य गाडगीळ मला ऑनलाईन गिटार शिकवतोय. तसंच दुसरीकडे माझं लिखाण देखील चालू आहे. याशिवाय काही सिनेमे जे वेळेअभावी बघायला नाही मिळाले त्या चित्रपटांचा मी आस्वाद घेतोय.”

‘चला हवा येऊ द्या’ च्या चित्रीकरणामुळे एरवी घरी इतका वेळ देता येत नसल्यामुळे आता सागर मुलीसोबत खेळण्यात, तिच्यासोबत मस्ती करण्यात व्यस्त आहे. त्याचसोबत त्याचे छंद जोपासतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 5:48 pm

Web Title: sagar karande learning guitar through online classes ssv 92
Next Stories
1 करोना संदर्भातील ‘या’ नियमामुळे काही मालिकांच्या प्लॉटमध्येच होणार बदल
2 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकारांचे एका भागाचे मानधन माहित आहे का?
3 ….अन् एकता कपूरला ‘पवित्र रिश्ता’साठी मानव मिळाला!
Just Now!
X