30 September 2020

News Flash

…म्हणून तैमूर होणार चाहत्यांच्या दृष्टीआड

सतत प्रसारमाध्यमे, चाहते आणि फोटो या साऱ्याची तैमूरला सवय झाली आहे.

सैफ, करिना आणि तैमुर अली खान

पतौडी कुटुंबाचा छोटा नवाब दररोज त्याच्या नवनवीन लूकमुळे साऱ्यांची मनं जिंकत असतो. दररोज त्याचा एकतरी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. तैमूलादेखील या स्टारडमची सवय झाली असून तो प्रत्येक वेळी प्रसार माध्यमांसमोर हसत हसत सामोरा जात असतो. परंतु तैमूर लोकप्रियता पाहता सैफने एक निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता तैमूर चाहत्यांच्या नजरेआड होणार आहे.

स्टारकिडमध्ये अग्रगण्य स्थान असलेला तैमूरचे फोटो काढण्यासाठी त्याचे चाहते आणि प्रसारमाध्यमेही कायम उत्सुक असतात. परंतु या फोटोज, व्हिडिओमुळे तैमूर एवढ्या लहान वयामध्ये प्रकाशझोतात येत असून त्याचं बालपण हरवत आहे. यामुळेच सैफने प्रसार माध्यमे आणि चाहत्यांना यापुढे तैमूरचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे, असं सैफच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.

तैमूर लहान असल्यामुळे आता त्याचं वय खेळण्याचं -बागडण्याचं आहे. मात्र सतत प्रसारमाध्यमे, चाहते आणि फोटो या साऱ्याची तैमूरला सवय झाली आहे. त्याच्या या सवयीमुळे त्याचं बालपण कुठेतरी मागे राहता आहे. त्यामुळे त्याला त्याचं बालपण जगता यावं यासाठी सैफने घराबाहेर उभ्या राहणाऱ्या फोटोग्राफर्स आणि चाहत्यांना तैमूरचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे सैफने केलेल्या या विनंतीमुळे आता चाहत्यांना तैमूरचे फोटो काढता येणार नसून त्याचे अपडेटही मिळविता येणार नाही.

दरम्यान, तैमूर हा स्टाकिडमधील सर्वात लोकप्रिय असून या वयातच असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच तैमूरविषयी प्रत्येक अपडेट मिळविण्यासाठी त्याचे चाहते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:09 pm

Web Title: saif ali khan requested paparazzi to not click taimur ali khan
Next Stories
1 आर.के स्टुडिओच्या विक्रीसाठी कपूर कुटुंबीय करतेय ‘या’ कंपनीशी चर्चा
2 ‘बॉईज २’ च्या यशानंतर ‘बॉईज ३’ ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अॅण्ड चॉकलेट’मध्ये रवी काळे यांचा नवा अंदाज
Just Now!
X