News Flash

VIDEO: .. म्हणून आर्ची-परश्याला सोडावा लागला स्टेज

चाहत्यांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

VIDEO: .. म्हणून आर्ची-परश्याला सोडावा लागला स्टेज

सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे प्रचंड चाहते झाले आहेत. हे दोघेही एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला गेले होते. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गोंधळामुळे तो कार्यक्रमच रद्द करण्याची नामुष्की पोलिसांवर आली.
धन्वंतरी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील फॅशन शोसाठी सैराटची ही जोडी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी हे दोघेही पोहोचताच नागरिकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे आयोजकांना आणि पोलिसांना कार्यक्रम थांबवावा लागला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून रिंकू आणि आकाशला त्या ठिकाणी फक्त दोन मिनिटेच थांबता आले. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 1:46 pm

Web Title: sairat fane rinku rajguru and akash thosar leaves the stage in two minutes at nashik
टॅग : Rinku Rajguru,Sairat
Next Stories
1 शिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा ‘कॉपी’; गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न
2 ‘सरबजीत’चा मराठमोळा रंगभूषाकार सुभाष शिंदे
3 Ranbir Kapoor: रणबीर कपूरने मुंबईत घेतला ३५ कोटींचा फ्लॅट
Just Now!
X