20 October 2020

News Flash

…तर सलमानऐवजी ‘हा’ अभिनेता दिसला असता चुलबूल पांडेच्या भूमिकेत

या अभिनेत्याने 'दबंग'मध्ये देखील काम केली आहे

हटके स्टाइल, दरारा आणि गावगुंडांना धाकात ठेवण्याची अनोखी पद्धत या साऱ्यामुळे प्रेक्षकांची ज्याने मनं जिंकली तो चुलबूल पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग फ्रेंचाईजीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दबंग २’ नंतर तब्बल सात वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. सलमानच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याला दबंगगिरी करताना पाहायचं आहे. मात्र चुलबूल पांडे ही भूमिका सलमानपूर्वी बॉलिवूडमधील एका लोकप्रिय कलाकाराला करायची होती. विशेष म्हणजे त्याने ही इच्छादेखील व्यक्त केली होती.

सलमानच्या आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटामध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत झळकणार असून चित्रपटाची निर्मिती अरबाज खान करत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये अरबाजने ‘दबंग’ या चित्रपटाविषयी काही रंजक गोष्टी सांगितल्या. यावेळी बोलत असताना त्याला चुलबूल पांडेची भूमिका करायची होती, असं सांगितलं.

दबंग फ्रेंचाईजीची सुरुवात दिग्दर्शक अभिनव सिन्हा यांनी केली. २०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनव यांनी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट अरबाजला दिली होती. ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर, ‘रॉबिनहुड पोलिसांची भूमिका मला का देत नाही ‘?, असा प्रश्न अरबाजने विचारला. अरबाजला मक्कीऐवजी चुलबूल पांडेची व्यक्तीरेखा साकारायची होती. मात्र अरबाज मिक्कीच्या भूमिकेला जास्त न्याय देऊ शकतो असं दिग्दर्शकांचं मत असल्याचं अरबाजने सांगितलं.

पुढे अरबाज सांगतो, “चुलबूल पांडेसाठी दिग्दर्शक रणदीप हुड्डा आणि इरफान खान यांच्या नावाचा विचार करत होते. त्यावेळी यांच्याऐवजी मी चित्रपटाची निर्मिती करतो आणि चुलबूल पांडेसाठी तुम्ही सलमान खानचा विचार करा”, असा सल्ला मी दिला त्यानंतर चुलबूल पांडेसाठी सलमानला फायनल करण्यात आलं.

दरम्यान, आता अनेकांचे लक्ष सलमानच्या या आगामी चित्रपटाकडे लागलं आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 1:21 pm

Web Title: salman khan dabangg 3 chulbul pandey role in film ssj 93
Next Stories
1 जेव्हा जेनेलियाला झाला अमेयमध्ये रितेश दिसल्याचा भास
2 ‘सुपर ३०’च्या गाण्यावर हृतिकच्या आईचा डान्स पाहिलात का?
3 Video : हिमेश रेशमियामुळे दीपिकाला मिळाला होता ‘ओम शांती ओम’?
Just Now!
X