09 August 2020

News Flash

‘या’ अभिनेत्रीमुळे ‘दबंग ३’ साठी लागला ७ वर्षांचा कालावधी

२०१२ मध्ये 'दबंग २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता

सलमान खानचा आगामी ‘दबंग ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दबंग सीरिजमधील हा तिसरा चित्रपट असून यापूर्वी २०१२ मध्ये ‘दबंग २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘दबंग २’ पाहिल्यानंतर सलमानचे चाहते ‘दबंग ३’ ची आतुरतेने वाटत पाहत होते. मात्र ‘दबंग ३’ साठी चाहत्यांना तब्बल सात वर्ष प्रतीक्षा करावी लागली. अलिकडेच सलमानने ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना ‘दबंग ३’ च्या निर्मितीसाठी सात वर्ष का लागली यामागचं कारण सांगितलं.

‘दबंग २’ प्रमाणेच ‘दबंग ३’ मध्ये देखील सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. सईचा हा डेब्यु चित्रपट असून तिच्याचमुळे चित्रपटाच्या निर्मितीला सात वर्षांचा कालावधी लागली.

“या चित्रपटातून सई पहिल्यांदाच डेब्यु करत होती. त्यामुळे तिच्या तयारीसाठी आम्हाला वेळ हवा होता. भूमिकेला न्याय देण्यासाठी ती प्रॉपर डाएट आणि वर्कआऊट करत होती. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट करण्यासाठी ७ वर्षांचा अवधी लागला”, असं सलमानने सांगितलं.

‘दबंग’ चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यात पोलीस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2019 10:40 am

Web Title: salman khan discloses on kapil sharma show why it takes 7 years for dabangg 3 ssj 93
Next Stories
1 हरवली पाखरे.. ‘लहान मुलांच्याही ओठी सासू-सुनांचे संवाद..‘
2 नाटय़कर्मीची यशोगाथा
3 मकरंद देशपांडे यांचा मराठी रंगभूमीवर अभिनय प्रवेश
Just Now!
X