बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने चाहत्यांना दिलेली कमिटमेंट पूर्ण केली आहे. आज ईदच्या दिवशी सलमानचा ‘राधे- युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मात्र सिनेमा रिलीज होण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर करत दंबग खानने चाहत्यांकडे एक कमिटमेंट मागितली आहे.
सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात सलमानने प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना एक मेसज देत कमिटमेंट मागितली आहे. यात तो म्हणालाय, “एक सिनेमा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. खूप दु:ख होतं जेव्हा लोक पायरसी करून सिनेमा पाहतात. मी तुम्हा सर्वांकडून एक कमिटमेंट मागतो की योग्य प्लॅटफॉर्मवर योग्यरित्या सिनेमा एन्जॉय करा. तर ही आहे प्रेक्षकांची कमिटमेंट..नो पायरसी इन एंटरटेनमेंट”
View this post on Instagram
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हंटलंय, ” एंटरटेनमेंटमध्ये पायरसी नको.” सलमानच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे.
या ओटीटीवर पाहता येईल ‘राधे’
13 मे ला विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खानचा ‘राधे ‘ सिनेमा रिलीज होतोय. हा सिनेमा झी5, झी प्लेक्स, डिश टीव्ही, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीवर रिलीज होणार आहे. ‘पे पर व्हू’ या फॉरमॅटमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. म्हणजेच प्रत्येकवेळी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. Zee5 अॅपवर हा सिनेमा मे ला दुपारी १२ वाजता रिलीज होणार आहे.