बॉलिवूडचा चुलबुल पांडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमनाच्या ‘दबंग ३’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वयाच्या ५३ व्या वर्षी देखील सलमानची क्रेझ कायम आहे. अनेकजण सलमानला आयकॉन मानतात. बॉलिवूडमधील कलाकार हे प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळे कपडे परिधान करताना दिसतात. पण सलमान याला अपवाद आहे. तरीही तो लाखो तरुणींच्या मनावर राज्य करताना दिसतो.

बऱ्याच वेळा सलमान काळ्य रंगाचे कपडे परिधान करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानला त्याच्या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सलमानने मनसोक्त गप्पा मारल्याचे पाहायला मिळाले. ‘मी अनेक आर्टिकलमध्ये महिलांच्या ड्रेसवर राऊंड करुन तिने हा ड्रेस या कार्यक्रमात घातला होता आणि आता तसाच सेम ड्रेस पुन्हा नुकताच झालेल्या कार्यक्रमात परिधान केला आहे’ असे सलमान म्हणतो.

‘जर त्यांनी हा प्रश्न माझ्याबाबतीत विचारला तर तो प्रत्येक कार्यक्रमासाठी लागू असेल. कारण मी आजही पाच वर्षांपूर्वी घेतलेले शूज वापरतो. त्याच काळ्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये तुम्ही मला आजही पाहू शकता. माझा टी-शर्ट ५०० रुपयांचा असतो आणि तो मी अनेक वर्ष वापरतोय. पण यात चुकीचं असं मला काहीही वाटत नाही. माझे बेल्ट सुद्धा २० वर्षे जुने असतात. काही वर्षांपूर्वी कतरिनाने मला दिलेला बेल्ट मी आजही वापरतो’ असे सलमान पुढे म्हणाला.

आणखी वाचा : डिसेंबरमध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ३८व्या वर्षी करणार लग्न?

काही दिवसांपूर्वी ‘दबंग ३’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झालेल्या ३ मिनिटे २२ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सलमान आपल्या दबंग शैलीत गुंडांबरोबर फाईटींग करताना दिसत आहे. ‘दबंग – ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग – ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

आणखी वाचा : मंदिरा बेदीला मुलगी दत्तक घ्यायची आहे पण…

‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नाडामध्ये प्रदर्शित होणार आहे. दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे.