25 October 2020

News Flash

सलमानच्या ‘सुलतान’मधील पिळदार शरीरयष्टीसाठी फोटोशॉपचा वापर?

या भूमिकेसाठी सलमान व्यायामशाळेत बरीच मेहनत घेत आहे.

Salman Khan : या चित्रपटात रणदीप हुडा सलमानच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रीकरणादरम्यान, रणदीप हुडा अचानक बेशुध्द झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलीवूडच्या आगामी ‘सुलतान’ या चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानचा नवा लूक प्रदर्शित झाला आहे. सध्या ‘सुलतान’चे चित्रीकरण सुरू असून या भूमिकेसाठी सलमान व्यायामशाळेत बरीच मेहनत घेत आहे. चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी जीममधील त्याचे एक छायाचित्र ट्विट केले आहे. यामध्ये सलमानच्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडत आहे. मात्र, सलमानच्या या पिळदार शरीरयष्टीचे गुपित फोटोशॉपमध्ये दडल्याचा आरोप ट्विटरवर काहीजणांकडून करण्यात येत आहे. टीझर आणि पोस्टरमधील सलमानचे शरीर ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ते पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सलमानने सुलतानच्या फर्स्ट लूकचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले होते. पण पोस्टर आणि टीझरमध्ये दिसत असलेल्या सलमानच्या पीळदार शरीरासाठी फोटोशॉपचा वापर करण्यात आल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे.
salman_1

दरम्यान, चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जाफर आणि तरन आदर्श यांनी सलमानचे जीममधील छायाचित्र ट्विट करून सलमानची सर्व छायाचित्रे खरी असल्याचा दावा केला आहे.या चित्रपटात रणदीप हुडा सलमानच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील सलमानबरोबर या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 7:46 am

Web Title: salman khan works out in a new still from sultan
Next Stories
1 शुभांगी अत्रे आता ‘भाभीजी’
2 पुढच्या चित्रपटात सलमानसोबत दीपिका हा तर माध्यमांचा तर्क – कबीर खान
3 अंकुश ‘हॅशटॅग’चा ब्रँड अॅम्बेसिडर
Just Now!
X