दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने तीन दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. तीन दिवसांत १०१.४७ कोटींची कमाई करत अभिनेता सलमान खानच्या नावावर आणखी एक विक्रमच नोंदला गेला आहे. सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. सलमानचा अभिनय, दिवाळीची सुटी आणि सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाचा पुर्वानुभव या जोरावर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्याचे दिसते आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे प्रेम रतन.. च्या कमाईची बातमी दिली आहे. पहिल्याच दिवशी ४० कोटी ३५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१.०५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३०.०७ कोटी अशी तीन दिवसांतच १०१.४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशातील ४५०० चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, परदेशातील ११०० चित्रपटगृहातही प्रदर्शित झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2015 1:39 pm