प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन व्हावं यासाठी ओटीटीवर दर आठवड्याला नवनवे वेब शो आणि सिनेमा रिलिज होत असतात. तर या आठड्यातही असाच एक बहुप्रतिक्षित मराठी वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो म्हणजे स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितचा ‘समांतर-२’, गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत होते. १ जुलैला हा शो रिलीज झाला आहे. तेव्हा या वीकेण्डला तुम्ही संपूर्ण सिझन एकत्र पाहून संपवण्याचा विचार करत असाल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे.

यासोबतच नेटफ्लिक्सवर तापसी पन्नूचा मर्डर मिस्ट्री सिनेमा ‘हसीन दिलरुबा’ २ जुलैला रिलीज झालाय. या सिनेमात तापसीसोबतच अभिनेता हर्षवर्धन राणे आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहेत. तर एखादा अ‍ॅक्शन हॉलिवूडपट पाहण्याचा तुमचा प्लॅन असेल तर ‘द टुमारो वॉर’ हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.  टाइम ट्रॅव्हर आणि एलियन विरुध्दचं भविष्यात घडणारं युद्ध या सिनेमाची रंजकता वाढवणारं आहे. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईमवर २ जुलैला रिलीज झाला असून हिंदीसह तेलगू आणि तामिळ या भारतीय भाषांमध्ये तो उपलब्ध आहे.

The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
Magnus Carlsen believes R Pragyanand is expected to perform well chess match
प्रज्ञानंदकडून चांगली कामगिरी अपेक्षित – कार्लसन
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: “विराट कोहलीला आऊट करशील का?” मनिमरन सिध्दार्थने कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, पाहा VIDEO
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

हे देखील वाचा: जेव्हा दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबत आमिर खानचं नाव जोडलं गेलं होतं!

या वीकेण्डला चाहत्यांसाठी मनोरंजनाचा हा खजिना खुपच खास आहे. यात समांतर सारखी सस्पेंस आणि खिळवून ठेवणारी वेब सीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहे. तर ‘हसीन दिलरुबा’ची मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना कोड्यात टाकणारी आहे.