News Flash

सानिया मिर्झाची बहीण मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलाशी करणार निकाह?

अनमचा हा दुसरा निकाह असून गेल्याच वर्षी तिने पती अकबर रशीदशी घटस्फोट घेतला.

अनम मिर्झा आणि असद

टेनिस स्टार सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदला डेट करत आहे. यावर्षाअखेर अनम आणि असद निकाह करणार असल्याचंही कळतंय. अनमचा हा दुसरा निकाह असून गेल्याच वर्षी तिने पती अकबर रशीदशी घटस्फोट घेतला. २०१६ मध्ये अनम आणि अकबर यांचा निकाह पार पडला होता आणि दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले.

अनम असदपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. या दोघांना अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. सानियाने नुकताच असदचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘फॅमिली’ (कुटुंब) असं लिहिलं होतं.

अनम फॅशन डिझाइनर असून तिचे स्वत:चे फॅशन आऊटलेटदेखील आहे. तर वडिलांप्रमाणेच असदला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असून त्याची नुकतीच गोव्याच्या रणजी टीममध्ये निवड झाली आहे.

अनम आणि रशीद यांचा निकाह २०१६ मध्ये धूमधडाक्यात पार पडला होता. यात चित्रपट, राजकारण आणि फॅशन जगतातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बॉलिवूड स्टार सलमान खान, परिणिती चोप्रा, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 6:09 pm

Web Title: sania mirza sister to tie knot with mohammad azharuddin son
Next Stories
1 शिल्पा शेट्टीचे जबरदस्तीने चुंबन घेणारा हा अभिनेता वयाच्या ६९व्या वर्षी झाला बाबा
2 विकी, रणबीर की शाहरुख कोण साकारणार अंतराळवीर राकेश शर्मांची भूमिका?
3 प्रियांकानं दिलेला दगा विसरणं अशक्य, सलमाननं एकत्र काम करण्यास दिला नकार
Just Now!
X